अकलूज – अकलूज नगर परिषद निवडणूक आज सकाळी 7/30 वाजता मतदान सुरू झाले एकूण 34408 मतदार असून पैकी 17 205 पुरुष तर 17190 स्त्री मतदार आहेत इतर 13 मतदार असून एकूण 39 मतदान केंद्र आहेत.
या निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे युती, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युती असे प्रमुख तीन पक्ष लढत असून सकाळपासून मतदान सुरळीत चालू झाले होते.

सकाळी प्रभाग क्रमांक 5 मध्ये आठ वाजता मतदान मशीन (EVM) बंद पडल्याने सुमारे एक तास मतदान खोळंबले होते मात्र मतदान अ धिकार्याने दुरुस्त करून मतदान सुरू केले यानंतर दुपारी 3/30 वाजता प्रभाग क्रमांक 7 बुथ 3 वर भाजपच्या उमेदवार अंकिता अंबादास पाटोळे यांचे पती व उमेदवार प्रतिनिधी अंबादास पाटोळे यांनी मशीनवर भाजपचे बटन दाबले जात नाही म्हणून Evm मशीन जमिनीवर आपटून फोडले याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने रीतसर तक्रार दाखल केली आहे.

याविषयी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार दिव्यानी रास्ते यांनी या घटनेचा निषेध करून फेर मतदान घ्यावे असे माध्यमांशी बोलताना सांगितले तर नगरसेवकाचे उमेदवार क्रांतिसिंह माने पाटील यांनी या सर्व प्रकारात वाया गेलेला एक तास मतदान वाढवून मिळावे अशी मागणी केली तर माजी सरपंच किशोर सिंह माने पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत बनसोडे यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली आहे.

याबाबत पोलिसांनी अंबादास पाटोळे यांना मशीन फोडल्याचे आरोपावरून ताब्यात घेतले पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी सांगितले अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगितले.

आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर तसेच जयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच डॉक्टर धवल सिंह व उर्वशी राजे मोहिते पाटील यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

आज सकाळी भाजपचे कार्यकर्ते माजी आमदार रामभाऊ सातपुते,राजकुमार पाटील,प्रकाश पाटील सुजय माने पाटील शैलेश कोतमिरे हे नगर परिषदेच्या समोर आले याच वेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, संग्राम सिंह मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हेही आले होते.
यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सर्वांना मार्गस्थ केले. दुपारी 3/ 30 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
























