बार्शी – यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोजर कॉलेज ऑफ फार्मसी, खांडवीचे प्रा. शिवाजी मारुती पाटील व प्रा. रणजीत मधुकर शेळके यांना नॅक ऍक्रेडिटेड माधव युनिव्हर्सिटी पिंडवारा सिरोही, राज्यस्थान विद्यापीठ यांच्याकडून फार्मास्युटिकल सायन्स या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक आणि औषध संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
प्रा. शिवाजी पाटील यांनी “फॉर्मलेशन अँड एवोल्युशन ऑफ इन्व्हेजोम्स लोडेड जेल फॉर इम्ˈप्रूव्ह् अँटी फंगल ऍक्टिव्हिटी” या विषयावर संशोधन केले. तसेच प्रा. रंजीत शेळके यांनी “अनालिटिकल मेथड डेव्हलपमेंट अँड वलिडेशन फॉर दि इस्टिमेशन ऑफ अँटीहायप्रेटेनसिव्ह ड्रग्स युजिंग स्पेक्ट्रोस्कॉपिक अँड क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स” या विषयावर संशोधन केले. सदर शोधनिबंधावरती दोघांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन संशोधन पेपर सादर केले आहेत. या संशोधनातून भारतीय औषधनिर्मिती क्षेत्राला नव्या दिशा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या प्रकल्पासाठी त्यांना माधव युनिव्हर्सिटी राजस्थानचे कुलगुरु, फार्मसी अधिष्ठता व प्राचार्य डॉ. सुशील भार्गव व डॉ. सुनील कुमार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच पीएचडी पूर्ण करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित करपे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या या कामगिरीमुळे सोजर कॉलेज ऑफ फार्मसीचा शैक्षणिक क्षेत्रात गौरव व विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात प्रेरणा मिळाली आहे.
दोघांच्या संशोधन क्षेत्रातील यशाबद्दल यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था अध्यक्ष अरुणदादा बारबोले, सचिवा सौ. कल्पनाताई बारबोले, प्राचार्य डॉ. सुजित करपे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक आणि संशोधन कार्यात यश मिळावे, यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.






















