पंढरपूर – सनातन धर्माचा दीपस्तंभ दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठाचा वतीने आदिशंकराचार्याची मूर्ती देउन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा सन्मान करुन त्यांना आशीर्वाद देण्यात आले.
येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी शृंगेरी शारदा पीठाचे ३६ वे जगद्गुरु श्री श्री श्री भारतीतीर्थ सन्निधानम महास्वामीजी आणि विद्यमान ३७ वे जगद्गुरु श्री विधूशेखर भारती सन्निधानम महास्वामीजी यांची भेट घेतली.
यावेळी श्री नाथ संस्थान औसाच्या वतीने भारतीतीर्थ सन्निधानम महास्वामीजी आणि श्री विधूशेखर भारती सन्निधानम महास्वामीजी यांना श्री विठ्ठलाची मूर्ती व शाल अर्पण केली व सद्भावपूर्ण दर्शन घेतले. दोन्ही शंकराचार्य महास्वामीजींनी सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराजांना शाल व आदिशंकराचार्यांची मूर्ती देऊन आशीर्वाद प्रदान केले.
















