वेळापूर – पिसेवाडी तालुका माळशिरस येथील जि प पिसेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रकला ग्रेड परीक्षा मध्ये घवघवीत यश मिळवले आहे.
महाराष्ट्र शासन कला संचलनालय मुंबई तर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये एलिमेंट्री व इंटरमिजिएट या परीक्षेसाठी एकूण ३४ विद्यार्थी परीक्षेत बसले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला यामध्ये ए ग्रेड ७ विद्यार्थी,बी ग्रेड मध्ये १२ व सी ग्रेड मध्ये १५, याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक जालिंदर बनकर सयाजी माने प्रशांत चिंचकर, प्रशांत पाटील, कृष्णदेव तुपे, अवंती सिंदफळकर, सारिका शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी केंद्रप्रमुख बापूसाहेब नाईक नवरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अण्णासाहेब शेंडे उपाध्यक्ष अमोल राऊत सरपंच मोहन भाकरे उपसरपंच भाऊसाहेब पिसे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.






















