सोलापूर – नऊ वर्षांपासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका न झाल्याने पक्षाचे कार्यकर्ते निवडणूकीच्या प्रतिक्षेत आहेत. याच पार्श्वभूमीवर दक्षिणच्या राजकारणात दररोज नवनवीन राजकीय घडामोडी होताना दिसून येत आहेत. भाजपाविरोधात सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढविण्याच्या चर्चा सुरू असून त्या पार्श्वभूमीवर राष्र्टवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पदाधिकार्यांनी काॅंग्रेसभवनमध्ये जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार यांची भेट घेऊन आघाडीबाबत चर्चा केली.
मंद्रूपसह जिल्हा परिषद गटात भाजपा व काॅंग्रेस पदाधिकारी निवडणुकीसाठी सक्रीय होऊन व्यूहरचना आखत आहेत. म्हणून
महायुतीमधील घटक पक्ष असणार्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार महाविकास आघाडी पक्षातील काॅंग्रेस कमिटीकडे आघाडी करण्यासाठी गेल्याचे दिसून येत आहेत.
दहा वर्षापासूस आमदार सुभाष देशमुख यांनी कोट्यावधी रूपयांची विकासकामे करून भाजपाला सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचविला आहे. तर दुसरीकडे तालुक्यात काॅंग्रेसला मानणार्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत राष्र्टवादी उमेदवार निवडून आणण्यासाठी मंद्रूपचे राष्र्टवादीचे नेते व तालुकाध्यक्ष काॅंग्रेस भवन येथे जाऊन जिल्हाध्यक्ष शटगार यांच्याशी आघाडीबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र
काॅंग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून आघाडी आम्ही होवू देणार नसल्याचे सांगत आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येते . त्यामुळे राष्र्टवादी व काॅंग्रेसची आघाडी होणार का ? याकडे तालुकावासियांचे लक्ष लागून राहीले आहे.
….
चौकट
.,..
मंद्रूप जिल्हा परिषद गटाची जागा काॅंग्रेसला मिळू नये, अशी रणनीती काही नेते करत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात काॅंग्रेस मजबूत असल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाशी युती झाल्यास काॅंग्रेसला दक्षिण सोलापूरमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वतंत्र लढण्यावर ठाम आहेत.
महमद शेख , जिल्हा सचिव, काॅंग्रेस
….
भाजपाविरोधात आघाडी
….
राष्र्टवादी अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार काॅंग्रेससोबत चर्चा सुरु आहे. तालुक्यात भाजपाला रोखण्यासाठी सर्वपक्षीय आघाडी सुरू असून त्याची तयारी सुरू आहे. आघाडीबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे.
सुभाष पाटील, तालुकाध्यक्ष, राष्र्टवादी काॅंग्रेस अजित पवार, दक्षिण सोलापूर
…..
सुभाष पाटील





















