सोलापूर – समस्त पद्मशाली समाजाचे कुलदैवत चिरंजीव महर्षी श्री मार्कंडेय जन्मोत्सवाचे औचित्य साधून सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने सर्व समाजाच्या महिलांसाठी मोफत ‘ऑनलाइन’ व ‘ऑफलाइन’ उपक्रमांचे आयोजन केल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी दिले आहे.
आज प्रत्येक घरातील ‘स्त्री’ घराचे प्रपंच बघता – बघता दिवस कधी मावळतो, हे त्यांच्या लक्षात येत नाही. नोकरदार आणि व्यवसायिक महिलांचे याहून वेगळेच. नोकरी आणि व्यवसाय सांभाळत घराचे प्रपंच बघावा लागतो. म्हणून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. अशा महिलांसाठी दि. २० ते २४ जानेवारी पर्यंत असे पाच दिवस दररोज सकाळी ८ ते ८.४५* यावेळेत घरबसल्या मोफत ऑनलाइन ‘योगा’ शिकवणार आहेत. सौ.उत्कर्षा वेंकटरमण कुचन. योगा शिकवण्यामध्ये त्यांचा दहा वर्षांचा अनुभव. तसेच योगामध्ये एम.ए. झाल्या, डिप्लोमाही केल्या. ऑनलाइन योगामध्ये महिलांना सर्वरोग निवारणासाठी सूर्यनमस्कार, महिलांच्या मासिक पाळीमध्ये आजार PCOD, PCOS आणि BP (उच्च रक्तदाब), Sugar (मधुमेह), मायग्रेन, स्पोंडिलायसेस अश्या सर्व आजारांवर मात करण्यासाठी आसने व प्राणायम शिकवतील.ऑनलाइन सहभागी होण्यासाठी 9014595939 या क्रमांकावर संपर्क करावेत. (फक्त महिलांनी)
दि. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी पर्यंत हे वर्कशॉप फक्त महिलांसाठीच असणार आहे. यासाठी ‘नाममात्र फी’असून एकूण १४ दिवस चालणार आहे. ‘आरी वर्क’साठी शिकण्यासाठी लागणारे साहित्य स्वतः आणावयाचे आहेत. हे प्रशिक्षण वेलकम फाउंडेशनचे संचालिका सौ. उमा बिल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. सध्याच्या काळात ‘आरी वर्क’ला भरपूर मागणी आहे. शिकून स्वतःचा व्यवसाय सुरु करता येतो. हे वर्कशॉप महिलांसाठीच असून 7304357225 या क्रमांकावर संपर्क साधावेत. वर्कशॉपचा पत्ता अशोक चौक परिसरातील, श्री गणेश मंदिर जवळ, साईबाबा चौक असे आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















