जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
खा. प्रणिती शिंदे, जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्यासह नेतेमंडळी यांच्या उपस्थिती
सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटनात्मक तयारीला वेग दिला असून, जिल्ह्यातील सर्व तालुके व मतदारसंघांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यशस्वीरीत्या पार पडल्या. या प्रक्रियेमुळे तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उमेदवारीसाठी मोठी चुरस दिसून आली आहे.
अक्कलकोट, दुपारी मंगळवेढा व पंढरपूर आणि सायंकाळी मोहोळ या चार तालुक्यांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती त्याच तालुक्यात घेण्यात आल्या.
दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेस भवन सोलापूर येथे पार पडल्या. माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा आणि बार्शी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती त्याच तालुक्यात घेण्यात आल्या.
या मुलाखती खा. प्रणिती शिंदे, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, प्रदेश चिटणीस/सचिव सुरेश हावळे, महिला जिल्हा अध्यक्षा डॉ. सुवर्णाताई मलगोंडा, तसेच
अक्कलकोट तालुका – तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, अशपाक बळोरगी, अरुण जाधव, निशांत कवडे
मंगळवेढा तालुका – अॅड. नंदकुमार पवार, अॅड. अर्जुनराव पाटील, सुरेश कोळेकर, तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, प्रदेश सचिव रविकिरण कोळेकर, संदीप पवार, दत्तात्रय जाधव
पंढरपूर तालुका – तालुका अध्यक्ष संदीप पाटील, शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर,
मोहोळ तालुका – सुलेमान तांबोळी, राजेश पवार, किशोर पवार, सुरेश हावळे, बाळासाहेब डुबे पाटील, राजेंद्र लांडे, ज्ञानेश्वर कदम, अरिफ पठाण, गजेंद्र खरात, सिद्राम पवार, सुरेश शिवपूजे, दक्षिण सोलापूर – भीमाशंकर जमादार,
उत्तर सोलापूर तालुका – भारत जाधव
तसेच माढा लोकसभा मतदारसंघातील तालुकाध्यक्ष संजय पाटील, गिरीश शेटे, सतीश पाचकुडवे, अजय इंगोले, राजकुमार पवार, विजय साळुंखे, बाळासाहेब मगर आदी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.उमेदवारांची जनाधारक्षमता आणि कार्यकर्त्यांशी असलेले संबंध हे देखील महत्त्वाचे निकष मानले गेले.
जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार म्हणाले, “इच्छुक उमेदवारांनी मांडलेल्या मागण्या, सूचना आणि आतापर्यंत केलेल्या कार्याचा संपूर्ण अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येईल. पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. आघाडीचा निर्णय वरिष्ठ नेतेमंडळी सर्वांना विश्वासात घेऊन घेतील.
प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरले पाहिजे : खा. शिंदे
यावेळी खा. प्रणिती शिंदे म्हणाल्या, “काँग्रेसचे जास्तीत जास्त जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून आणणे हेच आमचे ध्येय आहे. आले किती, गेले किती याचा विचार न करता प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरले पाहिजे. संघटनेची ताकद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आपली एकजूट हेच काँग्रेसचे खरे सामर्थ्य आहे.

























