मुदखेड: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार, भागवताचार्य परमपूज्य हभप सुनील महाराज आष्टीकर यांची मुदखेड येथे दिनांक ३१ जानेवारीपासून श्रीमद् भागवत कथा आयोजित करण्यात आली आहे.
श्री गणपती मंदिर कलशारोहण द्वितीय वर्धापनदिनानिमित्त परमपूज्य सद्गुरू नराशाम महाराज येवतीकर यांच्या कृपाआशीर्वादाने
मुदखेड मोंढा भागातील सुभाष गंज येथे हभप भागवताचार्य सुनील महाराज आष्टीकर यांच्या अमृतवाणीतून दिनांक ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान दुपारी एक ते चार या वेळात श्रीमद् भागवत कथा होणार आहे.
दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता हभप सुनील महाराज आष्टीकर यांचे काल्याचे किर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.या सर्व धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुदखेड येथील समस्त गावकरी मंडळी परिश्रम घेत आहेत.

























