सोलापूर – शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून करण्यात आले.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाप्रमुख अजय दासरी, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी वंदनिय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे.. बाळासाहेब परत या परत या, जय भवानी जय शिवराय असे घोषणा देत परिसर दणाणून गेला होता.
यावेळी माजी महापौर अलका राठोड, शहर प्रमुख नाना मोरे, जगदीश कलकेरी, सुरेश शिंदे, मुलाणि, विभागाचे प्रमुख पिरजादे, दत्ता रूचनभैरे अदि शिवसेना पदाधिकारी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























