अक्कलकोट – श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट व सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 31वी ज्युनियर मुले व मुली राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये मुलांच्या स्पर्धेमध्ये सोलापूर मनपा संघाने लातूर संघास 3_1 होमरन ने पराभव करत विजेतेपद पटकावले
मुलांमध्ये तृतीय स्थान जळगाव संघाने अमरावती संघाचा 7_1 होम रनने पराभव करत तृतीय स्थान पटकावले
तसेच मुलींमध्ये सांगली जिल्ह्याने जळगाव जिल्ह्याचा 3_1होमरनने पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले व तृतीय स्थानासाठी कोल्हापूर मुलींच्या संघाने पीसीएमसी संघाचा 7_0 होम रनने पराभव करत तृतीय स्थान पटकावले
या सर्व खेळाडूचे
वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष मा.नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक महेश इंगळे , जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पाटील राज्य सचिव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ प्रदीप तळवेलकर, युवा नेते प्रथमेश इंगळे, गोकुळ तांदळे , जिल्हा उपाध्यक्ष प्रा.संतोष गवळी, अभय बिराज, प्रसन्नजीत बनसोडे, यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या
या स्पर्धेसाठी पंच म्हणून संतोष आवचार ,गणेश बेटूदे ,भीमा मोरे, कल्पेश कोल्हे सोमनाथ नलावडे शेषराज वानखेडे विकास वानखेडे संकेत पावले स्वप्निल गदादे , शिवानी देशमुख,माधुरी महाजन आदी पंचांची भूमिका निभावली
या स्पर्धेचे आयोजन व नियोजन समितीचे अध्यक्ष श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मा.नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक महेशजी इंगळे, सॉफ्टबॉलचे सचिव स्पर्धा सचिव प्रा.संतोष खेंडे , मारुती घोडके , खजिनदार गंगाराम घोडके, मारुती घोडके,परमेश्वर व्हसुरे संचालक श्रीधर गायकवाड, रवींद्र चव्हाण, प्रशांत राणे, प्रबुद्ध चिंचोलीकर , संतोष पाटील, प्रशांत कदम, सिताराम भांड सागर जगझाप, महादेव वाघमारे, समर्थ आहेरवाडी अनिकेत कांबळे यांनी यशस्वी केले
























