सांगोला – येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजचे संस्थाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत एक दिवसीय श्रमदान शिबिराचे आयोजन हंगिरगे येथे करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन हंगिरगेचे सरपंच उत्तम सावंत, उपसरपंच अशोक चोरमुले, ग्रामसेवक बबलू कोळी, नराळेचे ग्रामसेवक बिभीषण सावंत तसेच रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ.यशोदीप गायकवाड, कॉलेजचे प्राचार्य डॉ.रणजित देशमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.पी.जी.पवार, सह.समन्वयक पी.बी.गायकवाड, कैलास सावंत, श्रीकृष्ण काटे, प्रा.पृथ्वीराज लिगाडे, प्रा.अनिल बोरकडे, प्रा.आनंद गायकवाड, प्रा.ज्योती राठोड मॅडम, अर्जुन लांडगे, दादासाहेब सावंत, धोंडीराम काटे, बंडू साबळे, सर्जेराव वाघ, बाळकृष्ण सावंत, निखिल काटे, कै.आ.काकासाहेब साळुंखे पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदा क्षीरसागर व सर्व स्टाफ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ.रणजित देशमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मृदुला पाटील, तनुजा मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्वयंसेवकांनी गावातील परिसर, धार्मिक स्थळे, जिल्हा परिषद शाळा स्वच्छ केली. श्रमदानासोबतच विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या संदेशावर आधारित पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छतेची प्रेरणा निर्माण करण्यात आली.


























