सांगोला – शुक्रवार दि.२३ जानेवारी स.११ वा. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्ज वितरण तसेच क्रेडिट कार्डचे उद्घाटन सोहळा तिरुवनंतपुरम, केरळ याठिकाणी संपन्न झाला.
या पार्श्वभूमीवर सांगोला नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या दालनात नगराध्यक्ष आनंद माने व मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्याहस्ते सांगोल्यातील ३० पथ विक्रेत्यांना पीएम स्वनिधी अंतर्गत कर्जाचे वितरण करण्यात आले. तसेच पथ विक्रेत्यांना कर्ज मंजुरीचे पत्र वितरित करण्यात आले.
यावेळी पदाधिकारी, कर्मचारी व लाभार्थी यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभाग नोंदविला. याप्रसंगी नगराध्यक्ष आनंद माने यांनी उपस्थित पथ विक्रेत्यांना मिळालेले कर्ज वेळेत परतफेड करण्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच ज्या पथविक्रेत्यांनी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा अद्याप लाभ घेतला नसेल अशा पथ विक्रेत्यांना या योजनेची माहिती देण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक नागेश गुंजोटे, युनियन बँक ऑफ इंडियाचे कर्ज व्यस्थापक प्रवीण खटकाळे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
























