बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व माजी विद्यार्थी कल्याणकारी संघ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ पी एम उषा, महाराष्ट्र खो खो असोसिएशन आणि सोलापूर खो खो अम्युचर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रित महिला खो खो स्पर्धेचे आयोजन मंगळवार ते गुरुवार दि. २२ जानेवारी या तीन दिवसांच्या विभागीय निमंत्रित महिला खो खो स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले.
गुरुवारी बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. अरुणदादा बारबोले, अध्यक्ष, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी हे होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे यांनी भूषविले. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, डॉ. बी वाय यादव, श्री. पी. टी पाटील, श्री. अरुण देबडवार, श्री जे सी शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले क्रीडाप्रेमी, बार्शीतील क्रीडा रसिक आवर्जून उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.पी. शिखरे यांनी कृतज्ञपूर्वक विचार मांडून सर्वांचे स्वागत करत प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अरुणदादा बारबोले यांनी यशस्वीपणे राबवलेल्या राज्यस्तरीय महिला खो खो स्पर्धेविषयी गौरवोद्गार काढले.
अध्यक्षपदावरुन बोलताना नंदनजी जगदाळे यांनी सर्व खेळाडूंची मनापासून कौतुक केले. खेळातून मनोरंजनासह करिअरच्या नव्या दिशा प्राप्त होतात. महिलांना प्रोत्साहन करण्याची स्पर्धा खरोखरच उल्लेखनीय ठरली, अशी भावना व्यक्त केली.
या स्पर्धेतील सर्व खेळाडूंच्यावतीने मनोगत व्यक्त करताना प्रतीक्षा तामचीकर, राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळ पुणे यांनी या स्पर्धेच्या यशाबद्दल अतिशय आनंद व्यक्त केला.
अशा स्पर्धांमुळे खेळाडूंमध्ये उत्साह वृद्धिंगत होतो, अशी भावना व्यक्त केली. या स्पर्धेसाठी कार्य करणाऱ्या सर्व पंचांच्यावतीने मनोगत व्यक्त करताना नितीन कस्तुरे यांनी स्पर्धेच्या यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाचे मनापासून कौतुक केले. तसेच स्पर्धा अत्यंत प्रभावीपणे आणि खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाल्याची भावना व्यक्त केली.
बक्षीस वितरण समारंभ, तुडुंब गर्दीच्या साक्षीने व सर्व मान्यवरांच्या व बार्शीकरांच्या उपस्थित संपन्न झाला. प्रथम क्रमांक छत्रपती क्रीडा मंडळ धाराशिव ट्रॉफी व रोख रक्कम २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांक राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळ पुणे, ट्रॉफी व रोख रक्कम १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक रा. फ. नाईक क्रीडा मंडळ ठाणे ट्रॉफी व रोख रक्कम ११ हजार रुपये. व चतुर्थ क्रमांक शिवभक्त क्रीडा मंडळ ठाणे रोख रक्कम रुपये ७ हजार व विशेष पुरस्कारांमध्ये अनुक्रमे उत्कृष्ट आक्रमकपणे कु. प्रियंका इंगळे पुणे, उत्कृष्ट खेळाडू कुमारी संध्या सुरवसे धाराशिव, अष्टपैलू खेळाडू कुमारी अश्विनी शिंदे धाराशिव.
कार्यक्रमाचे आभार डॉ. एस.एस. मारकड यांनी मांडले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी.ए. पाटील व डॉ. एल.आय. राठोड यांनी केले.
























