पिलीव – माळशिरस तालुक्यातील बस स्थानकावरील ,अहिल्या चौकातील संग्राम दोस्ती मंडळाच्या गणेश मंदिरात माघी गणेश जयंती निमित्त श्री गणेशाची जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी मुकुंद सुरवसे, कोळी यांच्या भजनी मंडळाने बहारदार भजनाचा कार्यक्रम सादर करून सामुहिक आरती सादर करण्यात आली .
यावेळी अध्यक्ष अतुल भैस सागर भैस ,सचिन पुकळे, अमिनखान पठाण ,शशिकांत लोखंडे ,युवराज गायकवाड, रणजीत काळे,कदिरखान पठाण, दामोदर लोखंडे ,अरुण मदने ,दिगंबर काका भैस ,प्रदीप चोबे ,जिशान शेख बाबासाहेब सय्यद ,संतोष खेत्रे, अरुण मदने ,सुनील सुतार ,मुकुंद सुरवसे, सुरज कस्तुरे ,जयराम सुरवसे ,समीनखान पठाण, आरमान शेख, योगेश सुतार ,वैभव सुतार व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होऊन सहभागी झाले होते माघी गणेश जयंती निमित्त भाविकांनी श्री गणेशाची मनोभावे पूजा करून आरतीचा व दर्शनाचाही लाभ घेतला. त्याचप्रमाणे कोष्टी गल्लीतील चौंडेश्वरी मंदिरातील श्री गणेश मंदिरात भक्तीमय वातावरणात मागी गणेश जयंती साजरी करण्यात आली .यावेळी देवांग कोष्टी समाज संघटनेच्या वतीने सकाळचा अभिषेक व पुजा श्री व सौ प्रसाद दौंडे यांच्या हस्ते दुपारची महाआरती श्री व सौ सोमनाथ दौंडे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संजय रोकडे, विनोद तावरे, पिंटू टकले ,परि बुगड ,निरंजन टकले प्रसाद दौंडे ,सोमनाथ दौंडे ,किरण करमाळकर व समस्त देवांग कोष्टीसमाज संघटनेचे नागरिक ग्रामस्थ ,व भक्तगण उपस्थित होते सदरचा गणेश जयंतीचा कार्यक्रम कोष्टी गल्लीतील चौंडेश्वरी मंदिरात संपन्न झाला
संग्राम दोस्ती मंडळ गणेश मंदिरात भजन व आरती करताना मंडळाचे पदाधिकारी भजनी मंडळ व भक्तगण व नागरिक























