हाणेगाव – दि.24/01/2026 रोजी कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात भूगोल विभागाकडून आज भूगोल दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बिरादार उमाकांत सर हे होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भूगोल विभागाचे प्रा. डॉ. बालाजी राठोड सर, प्रा. डॉ. पलवी कनाडे मडम आणि प्रा. डॉ. रेखा पाटील मडम या होत्या. कार्यक्रमाचे आयोजक भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुर्यकांत कळसकर सर यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजक भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. कळसकर सर यांनी कार्याक्रमच्या प्रास्ताविकेतून नैसर्गिक घटकाच्या अनेक चमत्कारिक घटकांविषयी माहिती सांगितली तसेच डॉ. सुरेश गरसोळे सर यांनी डॉ. सी. डी. देशपांडे सरांनी भूगोल विषयासाठी केलेल्या गौरवशाली कार्याबद्दल त्यांचा जन्म दिवस 14 जानेवारी हा दिवस भूगोल दिन म्हणून सजरा करण्यची सुरुवात केली. असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले भूगोल विभागाचे प्रा. डॉ. पलवी कनाडे मडम यांनी विद्यार्थ्यांना भूगोल दिनाचे महत्व, नैसर्गिक घटकाचे मानवी जीवनामध्ये महत्व, त्याच बरोबर विद्यार्थांना हसवण्याबारोबरच जीवनाचे एक निश्चित ध्येय ठेवून त्यानुषंगाने विद्यार्थांनी अभ्यास आणि प्रयत्न करावेत असे मार्गदर्शन केले.
भूगोल विभागाचे प्रा. डॉ. बालाजी राठोड सर यांनी या कार्यक्रमात बोलताना लोकसंख्या वाढीमुळे नैसर्गिक साधनसंपतीवर भार वाढत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. यासाठी पर्यायी साधन संपतीचा वापर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य प्रा. डॉ. उमाकांत बिरादार सर यांनी विद्यार्थांनी निसर्गाप्रती आपली जबाबदारी सांभाळून वृक्ष लागवड आणि संवर्धन करावे. त्याचबरोबर स्वच्छ आणि सुंदर पर्यावरणासाठी कार्य करावे. असे मार्गदर्शन विद्यार्थांना केले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणारी बी.ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी गीरेवाड वैशाली हिने आतिशय सुंदर आणि उत्कृष्ठ सूत्र संचालन केले. या कार्यक्रमासाठी भूगोल विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते. तर आभार बी.ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी शिंदे मनीषा हिने आभार व्यक्त केले.
हा कार्यक्रम घेण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंचशील एकंबेकर सर यांनी परवानगी दिली होती. संस्थेचे कार्यवाहक प्रा. डॉ. चरणसिंग राठोड सर यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे मुख्य लिपिक श्री. पवार सर, प्रा. डॉ. साबणे सर, प्रा. डॉ. शिंदे सर, प्रा. डॉ. एमेकर सर, भूगोल विभागाचे प्रा. डॉ. सौ. रेखा पाटील मडम श्री. बंडू पाटील, श्री. शंकर राठोड, श्री. चव्हाण. एम एस. श्री. संतोष सुरेवाड, श्री. प्रवीण राठोड, श्री मचकुरी मोसिन यांनी सहकार्य केले.
























