पंढरपूर – एकत्र येऊया आणि गावाचा, तालुक्याच्या प्रगतीसाठी पुढे जाऊया. तुमची साथ आणि आशीर्वाद असाच कायम आपल्या पाठीशी राहू द्या असे आवाहन विठ्ठल कारखान्याचे चेअरमन तथा माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी केले.
तालुक्यातील मेंढापूर येथील जागृत देवस्थान श्री दुग्धेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून आणि दुग्धेश्वराचा आशीर्वाद घेऊन या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीतील उमेदवारांच्या विजयी संकल्पाचा श्रीगणेशा करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष तथा माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले की, सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन आपणाला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याच धर्तीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत आपल्या विचारांचा उमेदवारांना आपण निवडून देऊ असे देखील आवाहन करीत तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमच्या सोबत आपण खंबीरपणे उभे आहोत असे सांगितले. तुमचं प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या या विश्वासास पात्र होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन देखील यावेळी आमदार पाटील यांनी दिले.
——————-
पंढरपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय उराशी बाळगून शनिवारी (दि.२४) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, वसंतराव देशमुख,सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
———————–
उमेदवारांची फळी सक्षम आहे
ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही उमेदवारांची फळी सक्षम असून, येत्या निवडणुकीत त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन देखील यावेळी आमदार अभिजीत पाटील यांनी केले.





















