सोलापूर : “परीक्षा पे चर्चा 2026” या उपक्रमांतर्गत पीएम श्री केंद्रीय विद्यालय, मध्य रेल्वे, सोलापूर येथे ऑपरेशन सिंदूर या विषयावर प्रश्नोत्तरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सोलापूर शहरातील एकूण 09 नामांकित विद्यालयांमधील 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये 50 माध्यमिक व 50 उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
स्पर्धा माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा दोन स्तरांवर घेण्यात आली. दोन्ही स्तरांवरून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे सोलापूरचे प्राचार्य श्री उमाकांत जोशी यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व पुस्तके देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यालयांमध्ये स्टेट बोर्ड व सीबीएसई बोर्ड मधील प्रत्येकी 50 विद्यार्थ्यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री दिलीप कुमार यादव (स्नातकोत्तर शिक्षक – हिंदी), श्रीमती अनुपमा गौड़ (चित्रकला शिक्षिका) तसेच श्री तुषार भागवत सरवदे (प्रशिक्षित स्नातक शिक्षक – इंग्रजी) यांनी आयोजक सदस्य म्हणून केले.





















