मोडनिंब – गणेश जयंती निमित्त मोडनिंब (ता.माढा) येथील एकदंत गणेश मंडळाच्या वतीने शहरातील घरोघरी प्रसाद वाटप करण्यात आले. गणरायाची भक्ती प्रत्येक घराघरात पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी श्री गणेशाचे विधीवत पूजन व आरती करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी श्रद्धेने प्रसाद स्वीकारत मंडळाच्या उपक्रमाचे स्वागत केले. एकदंत गणेश मंडळ वर्षभर सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून वृक्षारोपण व समाजोपयोगी कार्यही एकदंत गणेश मंडळाकडून सातत्याने राबवले जाते.मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वतः परिसरातील सराफ गल्ली, श्रीराम चौक, शिवशक्ती चौक, जय भवानी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी नगर येथे श्रद्धेने प्रसाद वाटप केले.
घराघरात पोहोचलेल्या या प्रसादाचे नागरिकांनी आनंदाने स्वागत केले. धार्मिक उपक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून मंडळाचे विशेष कौतुक करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय लादे, ऋत्विक तोडकरी, सौदागर मुळे, लखन पाटील, सोहएम शिंदे यासह एकदंत मंडळाचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.





















