सांगोला – तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व सांगोला विद्यामंदिर यांचे सन २०२६-२७ हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे. या अमृत महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीला भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय बास्केटबॉल संघाचे माजी कर्णधार व प्रशिक्षक संभाजी कदम यांचे शुभहस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे उपस्थितीत सोमवार दि.२६ जानेवारी रोजी स.९:३० वा. सांगोला विद्यामंदिर येथे बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकॅडमीचे उद्घाटन संपन्न होत आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेली ४४ वर्षे राज्यस्तरीय व मागील वर्षापासून राष्ट्रीय पुरुषांच्या निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन सांगोला विद्यामंदिर येथे केले जात आहे. आपल्या परिसरातील खेळाडूंना कौशल्य प्राप्त होण्यासाठी व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी शिस्तबद्ध प्रशिक्षणाची गरज आहे. यासाठी बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकॅडमी अंतर्गत संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमीची सुरूवात दोन इनडोअर कोर्ट मध्ये करण्यात येत आहे. तरी परिसरातील सर्व क्रीडाप्रेमी, खेळाडू, नागरिक यांनी उपस्थित राहावे व जास्तीत जास्त खेळाडूंनी अकॅडमीमध्ये सहभागी व्हावे. तसेच अधिक माहितीसाठी प्रशांत मस्के- ९८२२०३१८८८, अजित मोरे- ९५०३८०७०८० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकॅडमी कडून करण्यात आले आहे.
अकॅडमीची प्रमुख वैशिष्ट्ये-
आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्यात आलेले दोन आधुनिक बास्केटबॉल कोर्ट, अनुभवी प्रशिक्षकांकडून वैयक्तिक मार्गदर्शन, खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेसाठी विशेष व्यायाम आणि डाएट प्लॅन, ५ वर्षांवरील मुला-मुलींसाठी वेगवेगळे बॅचेस
























