सोलापूर – स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणच्यावतीने 03 घरफोडी व 13 कॉपर वायर चोरी अशा एकूण 16 गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी जेरबंद करण्यात आला आहे.
पोलीस उप निरीक्षक कुलदीप सोनटक्के यांचे पथकातील सफौ/ प्रकाश कारटकर, यांना सोलापूर तालुका, करकंब, मोहोळ, वळसंग, माढा, अकलुज, माळशिरस, पंढरपूर ग्रामीण इत्यादी पोलीस ठाणेकडील गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी हा पंढरपूर शहरातील एस.टी.स्टॅन्ड कडे येणार असल्याबाबत खात्रीशीर गोपनीय बातमी मिळाली. पोलीस उप निरीक्षक कुलदीप सोनटक्के व त्यांचे पथक मिळालेल्या बातमी प्रमाणे पंढरपूर शहरातील एस.टी.स्टॅन्ड परिसरात सापळा लावून शोध घेत असताना, बातमीतील इसम हा पोलीसांना पाहुन पळुन जावु लागला, तेंव्हा पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करुन शिताफीने पकडले. तेव्हा त्यास ताब्यात घेवून त्यांचे नांव व पत्ता विचारले असता, त्यांने त्यांचे नांव राहूल रतिलाल काळे, वय 30 वर्षे, रा. करकंब, ता. पंढरपूर जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. सदर आरोपीकडे सोलापूर ग्रामीण जिल्हयातील मालाविषयी गुन्हयांच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण विचारपूस करता, त्याने त्याचे इतर साथीदारांसोबत कॉपर वायर चोरी चे गुन्हे केले असल्याबाबत सांगितले. सदर आरोपीस सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरनं 440/2024 बीएनएस 303(2), 324(4) प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कुलदिप सोनटक्के, सफौ/ प्रकाश कारटकर, पोह/ सलीम बागवान, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, प्रमोद शिंपाळे, योगेश जाधव यांनी बजावली आहे.
























