अंबड – कंत्राटदारविरहित रोजगार व समान कार्य–समान वेतनाचे ठराव मंकरद पटेकर व बालकृष्ण गुंडपाटील यांनी माडले.व अनुमोदण गणपत शेळके व मदन गलबे यांनी देऊन हे दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले
अशोक खंडागळे यांची जिल्हा अध्यक्ष पदी.वंसत सोनुने यांची कार्याध्यक्ष पदी व विठ्ठल कळकुंबे सचिवपदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांचे जालना जिल्हा अधिवेशन अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. अधिवेशनाची सुरुवात प्रतीमापूजन, श्रमिक गीत व “भारतीय मजदूर संघ जिंदाबाद” या जोशपूर्ण घोषणांनी करण्यात आली.
अधिवेशनात भारतीय मजदुर संघाचे प्रदेश उपाध्यक्ष व वीज कामगार महासंघाचे महामंञी मा. अरूणजी पिवळ साहेब यांनी मार्गदर्शन करताना कंत्राटी वीज कामगारांना नोकरीत स्थैर्य, कंत्राटदारविरहित रोजगार व समान कार्य–समान वेतन मिळावे, यासाठी संघ आग्रही असल्याचे स्पष्ट केले. या मागण्यांसाठी कायदेशीर लढा तसेच आवश्यक असल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी जालना जिल्ह्यातील कामगारांनी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत व परिचय करून अधिवेशनाचे प्रभावी प्रास्ताविक मा.तात्यासाहेब सावंत यांनी सादर केले. अधिवेशनात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील कंत्राटी वीज कामगारांच्या गंभीर समस्या, अडचणी व त्यावरील ठोस उपाययोजनांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.
जिल्ह्यातील संघटनात्मक स्थिती, सदस्य नोंदणी व वर्गणी, सुरू असलेली न्यायालयीन प्रकरणे तसेच देणगी बाबत काटेकोर व पारदर्शक अंमलबजावणी करण्याचा बाबतीत मार्गदर्शन कार्याध्यक्ष अमर लोहार यांनी मार्गदर्शन करताना केले व या बाबतीत अंमलबजावणी संदर्भात निर्णय अधिवेशनात घेण्यात आला.
तसेच भारतीय मजदूर संघ नेहमीच सर्व सामान्य कामगारांबाबत, असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत लाभ मिळवून देण्या करीता संघर्ष करेल तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत मुंबई येथे 11 एप्रिल 2026 रोजी भव्य मोर्चा बाबतीत आवाहन जालना जिल्हा अध्यक्ष यांनी केले आहेत.
अधिवेशनात खालील महत्त्वाचे दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले —
वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना कंत्राटदारविरहित थेट रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्या नोकरीत स्थैर्य व संरक्षण देण्यात यावे.
कंत्राटी कामगारांना “समान कार्य – समान वेतन” या तत्त्वानुसार वेतन, भत्ते व सर्व सेवा सुविधा देऊन सामाजिक व आर्थिक न्याय सुनिश्चित करण्यात यावा.
या दोन्ही ठरावांना उपस्थित प्रतिनिधींनी जोरदार पाठिंबा देत एकमताने मंजुरी दिली.
यावेळी जिल्ह्याची नवीन संघटनात्मक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अशोक खंडागळे यांची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या. जिल्हाध्यक्षपदी.वंसत सोनुने यांची कार्य ध्यक्षपदी व विठ्ठल कळकुंबे यांची सचीवपदी निवड करण्यात आली. संघटनेतील पद हे सन्मान नसून जबाबदारी आहे, या भूमिकेचा निर्धार व्यक्त करत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी निष्ठेने, संघटितपणे व संघर्षशील पद्धतीने कार्य करण्याची शपथ घेतली.
वीज कामगार महासंघाचे छ.संभाजीनगर प्रादेक्षीक अध्यक्ष! मा.ज्ञानेश्वर हातकणंगने साहेब.यांनी.मार्गदर्शन करताना वीज क्षेत्रातील कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात संघटित व तीव्र लढा उभारण्याचे आवाहन केले. भारतीय मजदूर संघाच्या विचारधारेनुसार संघटन, संघर्ष व संवाद या मार्गाने कामगारांचे प्रश्न सोडविले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
निवड झालेल्या सदस्यांना वीज कामगार महासंघाच्या झोनल सह संघटनमंञी मा.विजय मेटे साहेब व चेअरमन वीज कामगार स.पतसंस्था मा.गणेश दाभाडे साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पञ देण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांसाठी चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
या अधिवेशनात मंजूर झालेले ठराव व निर्णय लवकरच संबंधित प्रशासन, वीज वितरण कंपन्या व शासनापर्यंत पोहोचवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संघटनेच्या वतीने पुढील संघर्षात्मक दिशा ठरविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
या अधिवेशनात कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.संतोषजी खरात साहेब जालना जिल्हा अध्यक्ष .भारतीय मजदूर संघ,व जिल्हा सचिव वीज कामगार महासंघ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व मा.तात्यासाहेब सावंत.सह संघटनमंञी महाराष्ट्र वीज कंञाटी कामगार संघ व जालना जिल्हा उपाध्यक्ष भारतीय मजदुर संघ.यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावीक केले मा.सुभाषजी कांबळे सह संघटनमंञी मराठवाडा.यांनी मार्गदर्शन केले. व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक खंडागळे यांनी केले संभाजीनगरचे संघटनमञी ज्ञानेश्वर वाघ हे उपस्थित होते तसेच .
यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या अधिवेशनास 300 पेक्षा अधिक कंत्राटी वीज कामगारांची लक्षणीय उपस्थिती होती.

























