बा-हाळी – जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने आयोजित दिव्यांग मुला-मुलींचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत बा-हाळी येथील ऐकलव्य निवासी अंध विध्यालयाने यश मिळवले आहे.
दि .19/01/2026 रोजी आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये नांदेड जिल्ह्यातील विविध प्रवर्गातील 75 शाळांनी सहभाग घेतला होता. बा-हाळी येथील ऐकलव्य निवासी अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग घेतला होता.
यात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अंध प्रवर्गातून ८ते १२वयोगटातून धावण्याच्या २५मि.स्पर्धेत बाजगिरे ओंकार नागनाथ द्वितीय,१२ ते १६ वयोगटात उभे राहून लांब उडी मध्ये भागवत विश्वंभर जाधव दूसरा, व पार्वती रामकिशन पवार गोळा फेक स्पर्धेत दूसरी आली.
विजेत्यांना अवधूत गंजेवार (जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड) योजना बनसोडे यांच्या हस्ते शाळेला प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच शाळेच्या विशेष कामगिरीबद्दल विशेष कौतुक करण्यात आले .
संस्थेचे अध्यक्ष श्री नि.म. वडगावकर गुरुजी सचिव रमेश दादा वडगावकर यांनी विद्यार्थी व सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक रत्नाकर ईखे,मोहन कोंडेवाड, बालाजी बारसोळे, बालाजी जाधव,मनोज अष्टूरे,सारंग दोसलवार,पांडुरंग रेनगूंटवार,लक्ष्मण संभाळे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांची मेहनत व अतुट परिश्रमामुळे यश प्राप्त झाले

























