नांदेड – दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाला विशेष अतिथी म्हणून येवली चे सरपंच यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ग्रामपंचायत येवली तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील सरपंच शितल गजानन कंठाळे व त्यांचे पती गजानन मारुती कंठाळे यांना दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन यांची पत्र मिळाले असून महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यातील सरपंच व सरपंच प्रतिनिधी म्हणून जाणार आहेत त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातून येवली येथील सरपंच शितल गजानन कंठाळे यांची निवड झाल्यामुळे त्यांना दिल्ली येथे दिनांक 24 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून निवड झालेली आहे त्या येवली गावच्या सरपंच असून तसेच हदगाव तालुका सरपंच संघटना उपाध्यक्ष आहेत व यशदा प्रवीण प्रशिक्षक म्हणून ते नांदेड जिल्ह्यामध्ये काम करत असतात .
पंजाब येथील पाचशे महिला सरपंच नांदेड येथील ग्रामपंचायतच्या अभ्यास दौऱ्या साठी आले असता जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडून समन्वयक निवड करण्यात आली होती त्यामध्ये सरपंच शितल गजानन कंठाळे यांनी निशुल्क उत्कृष्ट काम केले आहे अतिवृष्टी मुळे शेतकऱ्याचा अतोनात नुकसान झालं होतं त्यामुळे त्यांनी आपले सहा महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये दिले. तसेच येवली गावांमध्ये आरोग्य शिबिर, कराटे शिबिर, योग शिबिर, स्वच्छता शिबिर, महिला सक्षतीकरण शिबिर, व्यसनमुक्त गाव, प्लास्टिक मुक्त गाव, हरित गाव व शालेय शिक्षण यासाठी अहोरात्र काम करत आहेत गावांमध्ये वेगवेगळ्या योजनेतून शि.शि.रस्ते बंदिस्त नाली, प्युअर ब्लॉक रस्ते, अंगणवाडी बांधकाम, शाळा बांधकाम, सभा मंडप बांधकाम, पाणीपुरवठा विषयक कामे,असे विविध उपक्रम व कामे करून गावाचा विकासासाठी काम करत आहेत तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ते अतिशय प्रामाणिकपणे राबवत आहेत.त्या कामाची पावती म्हणून यशोदा पुणे व पंचायत राज विभाग महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद नांदेड, यांच्या सहकार्यामुळे हा बहुमान त्यांना मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या गावातील व परिसरातील त्यांचे मित्रमंडळी गावातील नागरिक अधिकारी वर्ग सरपंच संघटनेचे सर्व सदस्य तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे


























