पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आज दि.२५ जानेवारी रोजी मुंबई येथील भाविक सौ. सुशिला जयंतीलाल कानकीया यांनी कै. मदन मुकुंद मेस्त्री व कै. मथुरा मदन मेस्त्री यांच्या पावन स्मरणार्थ रुपये ५१,०००/- (एकावन्न हजार) इतकी देणगी अर्पण केली आहे.
या देणगीबद्दल मंदिर समितीच्या वतीने देणगीदारांचा व्यवस्थापक संदेश भोसले यांच्या हस्ते मंदिर समितीची दैनंदिनी व दिनदर्शिका देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी देणगीदारांचे कुटुंबीय तसेच मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
सद्यस्थितीत, माघी यात्रेचा कालावधी सुरू असून, भाविकांची गर्दी वाढत आहे. देणगी घेण्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती, ऑनलाईन देणगीसाठी QR CODE, RTGS, संकेतस्थळ, मोबाईल ॲप ची सुविधा उपलब्ध असून, देणगीसाठी इच्छुक भाविकांनी श्री संत तुकाराम भवन येथील कार्यालयास संपर्क साधावा असे विभाग प्रमुख राजेश पिटले यांनी यावेळी सांगीतले.
























