सोलापूर – शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) सेवासदन प्रशालेने आपले वर्चस्व कायम राखत १००% निकालाची परंपरा यंदाही जोपासली आहे. प्रशालेच्या विद्यार्थिनींनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या परीक्षेत प्रशालेतील एकूण ६२ विद्यार्थिनींनी यश मिळवले असून, त्यांची प्रतवारी (Grade) खालीलप्रमाणे आहे:
’ए’ (A) ग्रेड: १६ विद्यार्थिनी
’बी’ (B) ग्रेड: ३३ विद्यार्थिनी
’सी’ (C) ग्रेड: १३ विद्यार्थिनी
’ए’ ग्रेड मिळवणाऱ्या यशस्वी विद्यार्थिनी
आर्या सुर्वे, अनन्या जाधव, आसावरी सपकाळ, दुर्वा पवार, काव्या जगताप, प्रांजली वाघमारे, ऋतुजा लोंढे, संबोधी कांबळे, सानवी चव्हाण, श्रेया गवळी, वेदिका मोरे, प्रियांका वाघमारे, रेणुका सातपुते, शिवांगी जबडे आणि स्वरांजली चव्हाण या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कलाविष्काराचे प्रदर्शन करत विशेष श्रेणी प्राप्त केली.
या सर्व विद्यार्थिनींना कलाशिक्षक डॉ.किरण जोशी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी चित्रकलेतील बारकावे आत्मसात करत हे यश खेचून आणले.
विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल सेवासदन संस्थेच्या सचिवा सौ. वीणा पत्की, अध्यक्षा श्रीमती शीला मिस्त्री, शालेय समिती अध्यक्षा श्रीमती विद्या लिमये आणि संस्थेचे कार्यकारिणी सदस्य पद्माकर कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
तसेच मुख्याध्यापिका राजेश्री रणपिसे, उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका स्वाती पोतदार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे परिसरातून व पालकांमधून विद्यार्थिनींचे कौतुक होत आहे.

























