सोलापूर- आज रोजी प्रभाग क्र 8 चे नवनिर्वाचित नगरसेवक अमर पुदाले, गौरीशंकर दर्गो पाटील, गीता गवई,बबिता धुम्मा यांचे सत्कार हरि ओम विणकर बाग बहुद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी जंगम यांनी केली.
लक्ष्मीकांत दंडी आपल्या मनोगत व्यक्त करिताना लवकरात लवकर रोज पाणी देण्याचे काम,एकेकाळी विणकर बाग पूर्वभागाचे वैभव होते. साखरपेठ विहिरीचे पाईपलाईन बागेपर्यंत आले ते बागेत घेऊन बाग हिरवळ होण्यास मदत होईल.त्यावेळी बागेसाठी बागेमध्ये पाण्याची टाकळी बसवली परंतु टाकळी गळत आहे ते दुरुस्ती करून घ्यावी,रोज बागेत हजारो संख्याने पुरुष महिला फिरायला येतात.रोजचा रोज बागेचे झाडलोट करणे,बागेची निगराणी करणे,बागेला पाणी देणे याकामासाठी माळीची सोय करावी. बागेत विनाशुल्क पुरुष,महिलांसाठी मुतारीची सोय करावी.
संस्थेचे उपाध्यक्ष आपल्या भाषणात संस्थेने करीत असलेल्या कार्याबद्दल माहिती दिली.
सत्काराला उत्तरदेताना अमर पुदाले व बाकीचे नगरसेवक यांनी आपल्या भाषणात प्रभातील सर्व विकास कामे,विशेषता विणकर बागेतील सर्व काम तत्परतेने करू असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत दंडी, प्रास्ताविक गणेश सिद्धम, व आभारप्रदर्शन राजगोपाल गणपा यांनी केली.
सदर कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त अशोक यज्जा,पदाधिकारी, मिलींद बोमड्याल , रुक्मण्सा दौलताबाद, पत्तेवार, मुसलाप्पा कसा,मोहन भूमकर,मुरलीधर अरकाल, अरविंद वासी,कृष्णा गुर्रम, दुर्गेश सिद्दम व बहुसंख्य सभासद, प्रतिष्ठित मान्यवर व त्याभागातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

























