कुर्डूवाडी – भारतातील सर्वात मोठ्या भरवले गेलेल्या बारामती येथील कृषि प्रदर्शनामध्ये केव्हीके आयोजित कालवड चँंम्पियन स्पर्धेत माढा तालुक्यातील निमगाव टें येथील पाटलांच्या ‘ चिमणी ‘ कालवडीने सर्व किचकट निकश पार करीत प्रथम क्रमांक मीळवला आहे.याचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख एक्कावन्न हजार रूपये असा आहे.राज्यातुन अकरा दुर्मीळ कालवडीचा या स्पर्धेत सहभाग होता.
बारामती येथे सध्या उत्साहात सुरू असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनात केव्हीके आयोजित कालवड चॅम्पियन स्पर्धेत निमगाव टें येथील पशुपालक प्रदीपकुमार भागवत पाटील यांच्या पाटील डेअरी फर्म मधील एचएफ कालवडीने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना प्रथम पारितोषिकाचा मानाचा पुरस्कार आयोजक व सर्वेसर्वा राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये एच.एफ. कालवडींचा समावेश असून, प्रदर्शनासाठी १५ ते २२ महिन्यांपर्यंत वयाच्या कालवडींसाठी शर्थ व अटी लागू होत्या. या चॅम्पियन स्पर्धेत पाटील यांच्या बी.एफ. आम्रपाल सिमेन्सपासून जन्मलेल्या एच.एफ. कालवडीने सर्वोत्तम गुणवत्ता, संगोपन व देखभालीच्या निकषांवर अव्वल ठरत परीक्षकांची मने जिंकली.
या यशामागे पाटील यांना त्यांच्या आई-वडिलांचा आशीर्वाद, तसेच आदर्श सरपंच यशवंत शिंदे व गार्गी यशवंत शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय सोमनाथ चोरमुले व सुहास लट्टे यांचेही वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन त्यांना मिळाले. या स्पर्धेत कळस येथील कृषि प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या अनासरी मंचर येथील गणेश तावरे, योगेश तावरे याच्या ३ कालवडीसह यजमान बारामती येथील सहा कालवडींचा समावेश होता.अशा एकुण अकरा कालवडींचा स्पर्धेत सहभाग होता. या दैदीप्यमान यशामुळे निमगाव टें. परिसरासह तालुका व जिल्हा पातळीवर कृषी व पशुपालन क्षेत्रातून प्रदीपकुमार पाटील यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत असून निमगाव टें येथे वाजत गाजत गुलालाची मुक्त उधळण करीत पाटील व त्यांच्या त्यांच्या कालडीचे ग्रामस्थांनी स्वागत करीत आनंदोस्तव केला.या जातीचे कालवड पहील्या वेतास बत्तीस ते अडवतीस लिटरपर्यंत दुध देतात.
“माननीय राजेंद्र पवार यांनी बारामती कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांसाठी एक उत्कृष्ट व वेगळा व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अशा प्रदर्शनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, उत्तम ब्रिड व नव्या संधींबाबत प्रत्यक्ष माहिती मिळते, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.
आजच्या काळात तरुणांनी पारंपरिक शेतीबरोबरच उत्कृष्ट ब्रिड, शास्त्रीय संगोपन आणि आधुनिक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पशुपालन क्षेत्रात मोठी संधी असून योग्य मार्गदर्शन व मेहनतीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो.
शेतकरी हितासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारे माननीय राजेंद्र पवार यांचे कार्य प्रेरणादायी असून, त्यांच्या नेतृत्वाखाली असे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांच्या प्रगतीस नक्कीच दिशा देणारे ठरत आहेत.”
प्रदिपकुमार पाटील, पशुपालक निमगाव टें ता.माढा.
स्पर्धेत भाग घेण्यासाठीचे निकश.
कृषि प्रदर्शनात भाग घेण्यासाठी एच.एफ.सवर्गातील कालवडीचा समावेश असावा.कालवडीचे वय पंधरा ते बावीस महीन्यापर्यंतच असावे.त्यासाठी त्याची जन्म तारीख नोंदणीकृत असावी.कालवडीची हीष्टृी आवश्यक असून त्यामध्ये त्याचे आई -वडील, त्यांचे दुधाचे प्रमाण आवश्यक आहे.त्याचबरोबर कालवडीचे वजन, उंची व लांबी योग्य असणे गरजेचे आहे. कातण,पायाचे स्टेृट लाईन चालणे बरोबरच कासेची ठेवण योग्य असणे आवश्यक आहे.कालवड कोणत्या सिमेन्सचे आहे आणी कोणत्या सिमेन्सने गाभण आहे हे सिध्द करता आले पाहीजे.कालवड आदत असणे म्हणजे त्याचे दात लावले नसले पाहीजेत. सर्वात महत्वाचे म्हणजे कालवड गाभण असणे आवश्यक आहे. या सर्व निकशाची तपासणी केली जाते. जर कोणी हरकत घेतली तर ब्लड सँंपल घेतले जाते त्यावेळी दीलेली माहीती सिध्द झाली पाहीजे.तरच स्पर्धेत नंबर येतो.अशा कालवडीस चार ते पाच लाख किंमत मीळू शकते.

























