महाराष्ट्र – शासनाच्या क्रीडा व युवा धोरणानुसार जिल्ह्यातील युवकांनी समाजहितासाठी पार पाडलेल्या भूमिकेचा आणि दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन 2024-25 चा जिल्हा युवा पुरस्कार (युवती) म्हणून सामाजिक व युवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल करुणा अच्युत मोरे यांना प्रदान करण्यात आला. सोमवार दि. 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई मुंढे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
स्मृतीचिन्ह, मानपत्र, 10 हजार रुपयाचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, माजी राज्यमंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, माजी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उप जिल्हाधिकारी शशिकांत हदगल, क्रीडा अधिकारी श्रीमती लोंढे, आरती चिल्लारे आदींची उपस्थिती होती.
सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाची शासनाने दखल घेत पुरस्कार प्रदान केल्याने सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख, रमेश देहेडकर, सौ. रसना देहेडकर, बालाजी बळप, अंकुश काळे, रामकृष्ण हिवाळे, अच्युत मोरे, किरण साळवे यांच्यासह अनेकांनी अभिनंतर केले आहे.


























