सोलापूर – प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीवपूर्वक अवमान केल्याचा आरोप करत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी सोलापूर शहर काँग्रेस कमिटी व भीमसंघर्ष तरुण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीसंदर्भात सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष व भीमसंघर्ष तरुण मित्र मंडळाचे संस्थापक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन सादर केले. यावेळी विवेक कन्ना, भीमराव शिंदे, सागर गायकवाड, मयूर जगताप, पवन सग्गम व वेंकटेश बोम्मेन उपस्थित होते.


























