सांगोला – माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सांगोला यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मानगंगा परिवार मॅरेथॉन २०२६ ही स्पर्धा सांगोला येथे उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध गटांतील हजारो धावपटूंनी सहभाग नोंदवला. सदर मॅरेथॉन विविध गटांमध्ये घेण्यात आली.
सर्व विजेत्यांना ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र, गुलाबपुष्प व रोख रक्कम तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी माजी सहा.पो.आयुक्त भरत शेळके, मानगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन इंगोले, चेअरमन अर्चना इंगोले, व्हा.चेअरमन सुखदेव रंधवे, सचिन इंगोले, संचालक विवेक घाडगे, महादेव शिंदे, विजय वाघमोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय मुढे, आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, डॉ.शैलेश डोंबे, ॲड.गजानन भाकरे, डॉ.निरंजन केदार, पत्रकार अमेय मस्के, विज्ञान महाविद्यालयाचे क्रीडा संचालक विजय पवार, अविनाश इंगोले, कडलास मॅरेथॉनचे संयोजक टापरे, वेलनेस कोच खटकाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेश कोळी, विवेक घाडगे यांनी केले.
यांनी पटकावले क्रमांक
३ कि.मी.शालेय गट- मुलींच्या गटात प्रथम सानिका महानवर, द्वितीय प्रगती सरक (जांभुळवाडी, जत), तृतीय राजेश्वरी कीरगत (डोंगरगाव), मुलांच्या गटात प्रथम साहिल वाघमोडे, द्वितीय शिवम शिवशरण (जत), तृतीय सुरज खोत (कोगनोळी, कवठेमंकाळ)
५ कि.मी.खुला गट- महिला गटात प्रथम आरोही पाठमास (सोलापूर), द्वितीय रिद्धी सप्रे (श्रीगोंदा, नगर), तृतीय पूजा मासाळ (शिरभावी), पुरुष गटात प्रथम साहिल गायकवाड (मार्डी, माण), द्वितीय अजित चौगुले (वाढेगाव), तृतीय रविराज नरळे (बालाजी नगर)
१० कि.मी.खुला गट- महिला गटात प्रथम सानिका ऐवळे (पंढरपूर), द्वितीय सुरेखा मातने (श्रीगोंदा), तृतीय अक्षरा पवार (बालाजी नगर), पुरुष गटात प्रथम प्रवीण कांबळे (सांगली), द्वितीय सुशांत सरगर (कोळे,) व तृतीय अक्षय खोत (कोगनोळी)


























