पंढरपूर – पुण्याच्या रोटरी क्लब पुणे, पाषाण, जुन्नर आणि शिवनेरी या विविध शाखांतर्फे आर्थिक नियोजनातून साकार झालेल्या सुमारे जवळपास ८० लाख रुपयांच्या तीन मजली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वच्छतागृहाचे नुकतेच उदघाटन प्रांतपाल श्री व सौ रवी धोत्रे व श्री व सौ सुधीर पटवर्धन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले.या दिमाखदार सोहळ्याला रोटरी क्लबचे अध्यक्षा प्राजक्ता जेरे,पुणे रोटरी झोन २ चे सहाय्यक प्रांतपाल धनंजय राजुरकर, पुणे नॉर्थचे अध्यक्ष मोहन पुजारी रोटरी क्लब जुन्नरचे शिवनेरीचे कोषाध्यक्ष विनायक भागवत,पुणे पाषाणचे माजी अध्यक्ष अमित भदे, प्रताप पवार त्याचबरोबर इतरही रोटरीयन या कार्यक्रमला आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.वाय.पाटील यांच्या स्वागत व प्रस्ताविकाने झाली. त्यांनी स्वच्छतागृहाची गरज व रोटरीचे या कामी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर संस्थेचे मानद सचिव सु.र.पटवर्धन यांनी या कामाबद्दल रोटरीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व ही वास्तू विदयार्थ्यांना उत्तम आरोग्याची प्रेरणा देत राहील अशी आशा व्यक्त केली.
रोटरी पदाधिकाऱ्यां तर्फे प्रांतपाल रवी धोत्रे यांनी आपल्या मनोगतात संस्थेचे आभार मानून सदर स्वच्छतागृह हे विदयार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहिल असा आशावाद व्यक्त केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रोटरीयन प्राजक्ता जेरे यांनी भविष्यात या संस्थेसाठी आणखी प्रकल्प देण्याचे अभिवचन दिले. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी व सातत्याने पाठपुरावा करणारे सहाय्य क प्रांतपाल धनंजय राजूरकर यांनी ही इमारत विदयार्थ्यांना खुली करताना आपल्याला खूप आनंद होत आहे असे नमूद करून आपल्या भावना व्यक्त करून पुढेही विदयार्थ्यांप्रती आपली बांधिलकी कायम असल्याचे नमूद केले.
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अध्यक्ष नानामालक कवठेकर मानद सचिव सुधीर पटवर्धन व इतर संस्था सचिवांच्या हस्ते सर्व रोटरी प्रतिनिधींना शाल,श्रीफळ,हार, व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे पुणे रोटरीच्या सर्व शाखांतर्फे पंढरपूर एज्युकेशन सोसायटीतील सर्व पदाधिकाऱ्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रशालेतील विद्यार्थी व पंचम संगीत विद्यालयाचे शिक्षक श्री.केंगार यांनी स्वागत गीत त्याचबरोबर गीत मंच मधील गाण्याने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली या संपूर्ण गायनाने उपस्थित पाहुणे मंत्रमुग्ध झाले. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षांमध्ये प्रशालेमध्ये पार पडलेल्या जवळपास ३५ विविध बौद्धिक स्पर्धांचे असणारे विजेते विद्यार्थ्यांचा सन्मान उपस्थित अभ्यागतांच्या हस्ते करण्यात आला या बक्षीसांचे वाचन प्रशालेतील ज्येष्ठ इंग्रजी शिक्षिका सौ.मोहिते यांनी केले त्यानंतर श्री.पटवर्धन यांनी आपल्या भाषणामध्ये रोटरीयन पुणे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सदर इमारत ही कायमपणे विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ राहील याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवरांचे आभार प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका एस.एस. विश्वास यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षिका आकांक्षा बिराजदार यांनी केले या कार्यक्रमास पंढरपूर एज्युकेशन सोसायटी सर्व पदाधिकारी त्याचबरोबर शिक्षक बंधू शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थी त्याचबरोबर त्यांचे पालक व प्रतिष्ठित मान्यवर यांचाही या कार्यक्रमां मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता एकूणच हा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीत व उत्साहात पार पाडला.























