सोलापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते एकूण 40 जणांना गुणवंत अधिकारी – कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स रिफॉर्म्स कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपायुक्त आशिष लोकरे यांच्यासह संगणक विभागातील सर्व संगणक चालकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
सन्मान पत्र आणि गुलाब पुष्प देऊन हा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स रिफॉर्म्स कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपायुक्त आशिष लोकरे,संगणक प्रोग्रामर स्नेहल चपळगावकर, सहाय्यक संगणक प्रोग्रामर मतीन सय्यद जयदीप तावरे यांच्यासह संगणक विभागातील सर्व संगणक चालकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखाधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर, मुख्य लेखापरीक्षक सदानंद वाघमोडे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीश पंडित, मनीषा मगर, नगरसेवक अमोल शिंदे,आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, नगर अभियंता सारिका अकुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे, मुख्य अग्निशामक अधिकारी राकेश साळुंखे,अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, सामान्य प्रशासन विभागाचे रजाक पेंढारी, मिळकत कर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, अभियंता महादेव इंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा झाला गौरव
सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित( निवडणूक विभाग), नियंत्रण अधिकारी तपन डंके (अतिक्रमण प्रतिबंधक विभाग), मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार (घनकचरा व्यवस्थापन विभाग), सहाय्यक अभियंता महेश शिरसागर, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी (नगर अभियंता कार्यालय) सहाय्यक मुख्य लेखा परीक्षक तांत्रिक दीपक रजपूत (मुख्य लेखा परीक्षक कार्यालय) वैद्यकीय अधिकारी डॉ. लता पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. वाळवेकर, सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर (गवसू विभाग तांत्रिक), सहाय्यक अभियंता शकील शेख (नगररचना), झोनल अधिकारी क्रमांक तीन
जावेद पानगल (विभागीय अधिकारी क्रमांक सहा), झोन अधिकारी हनीफ बक्षी, कनिष्ठ अभियंता यांत्रिक राहुल शिंदे (सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय), आरोग्य निरीक्षक रोहित गवळी (घनकचरा व्यवस्थापन विभाग), वरिष्ठ मुख्य लेखनिक श्रीनिवास लिंगराज (मालमत्ता कर विभाग), नीता चिपडे (शहर क्षयरोग कार्यालय), वरिष्ठ मुख्य लेखनिक जयंत क्षीरसागर (अंतर्गत लेखापरीक्षक विभाग), वरिष्ठ श्रेणी लिपिक अर्चना दीक्षित (अंतर्गत लेखापरीक्षक), वरिष्ठ श्रेणी लिपिक कृपावती करसंकोलु (सामान्य प्रशासन विभाग), वरिष्ठ श्रेणी लिपिक नितीन गायकवाड (नगरसचिव विभाग), भांडारपाल विशाल जकातदार (सामान्य प्रशासन विभाग), कनिष्ठ श्रेणी लिपिक बसवराज जवळगी (मालमत्ता कर विभाग), शिवकुमार उदगिरी (निवडणूक कार्यालय), तृणाल लोखंडे (आयुक्त कार्यालय), फायरमन तानाजी मंठाळकर (अग्निशामक विभाग), शिपाई अशोक थोरात (भूमी व मालमत्ता विभाग), विनायक मोकाशे (अतिरिक्त आयुक्त दोन कार्यालय), अमोल सावंत (अतिरिक्त आयुक्त एक कार्यालय), वीरेंद्र इंडे (निवडणूक कार्यालय), मुकादम नरसिंग मुळे (नगर अभियंता कार्यालय), जमादार खाजाहुसेन झामाज (विभागीय कार्यालय क्रमांक आठ), सफाई कामगार इरफान शेख (विभागीय कार्यालय क्रमांक आठ), व्यंकटेश म्यातरोल्लू (घनकचरा व्यवस्थापन), झाडूवाली शोभा माने (विभागीय कार्यालय क्रमांक पाच), भाग्यश्री गोपाळे (घनकचरा व्यवस्थापन विभाग), कलावती कांबळे , धीरज सोनवणे (विभागीय कार्यालय क्रमांक पाच), बिगारी रमेश गायकवाड (विभागीय कार्यालय क्रमांक सहा), अतुल जाधव (विभागीय कार्यालय क्रमांक दोन), मजूर संजय यादगुले (उद्यान विभाग) आदी कर्मचारी अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.






















