वेळापूर – ग्रामपंचायतीच्या यांच्यावतिने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुली) वेळापूर येथील आदर्श शिक्षिका सौ. किरण (माने) घाडगे यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण करून यश संपादन केल्याबद्दल वेळापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे वेळापूर गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानास्पद भर पडली असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
या सत्कार सोहळ्यास वेळापूर गावच्या माजी सरपंच सौ. विमल उत्तमराव जानकर, वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासो मुंगुसकर, ग्रामपंचायत सदस्या डॉ. सौ. स्नेहलताई जीवन जानकर, सौ प्रियांका आडत सौ सीमा खाडे सौ विमल जाधव रविराज गायकवाड , ग्रामविकास अधिकारी कैलास सुरवसे, मीनाक्षी सरतापे सौ अनिता बनसोडे मनीषा भानवसे यांच्यासह वेळापूर ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य तसेच गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रमुख मान्यवर व पदाधिकारी . गावातील मान्यवर,विविधशाळा, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















