सोलापूर – जय महाराष्ट्र तरुण मंडळ शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ च्या उत्सव अध्यक्ष पदी अर्जुन घाडगे यांची निवड करण्यात आली. सालाबादप्रमाणे यावर्षी नुतन पदाधिकारी निवड व यंदाही उत्साही व जल्लोषपुर्ण वातावरणात करण्यात आली. मंडळाचे आधारस्तंभ दिलिप कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग पार पडली.
यामध्ये उपाध्यक्षपदी अरबाज शेख, कार्याध्यक्ष पार्थ कोल्हे, प्रसिद्धी प्रमुख राहुल काटे, रवि व्हनमोरे, कुणाल बाईंग, खजिनदार करण निकम, उपखजिनदार गिरिष मडिवाळ, सचिव आकाश जाधव, उपसचिव रोहित बळवंत, गुरुप्रसाद हिरेमठ, लेझीमप्रमुख रणजित कोल्हे, चंद्रकांत गायकवाड, रणविर कोल्हे, सल्लागार समिती अमित जेटिथोर, जावेद शेख, युवराज घाडगे, गुलाब शेख, मिरवणुक प्रमुख रवि कोल्हे, राजु पवार, सुभाष कदम, कादर जमादार यांची निवड करण्यात आली.
यावेळी मंडळातील लेझिम खेळाडुंची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.




















