करकंब : अभिछाया प्रतिष्ठान संचलित अमोल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करकंब येथील विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाच्या संशोधनासाठी आवश्यक माहिती प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहता यावी, वर्गाबाहेरच्या या अनुभवांमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक आनंददायी व अविस्मरणीय ठरावा या उद्देशाने कृषीविज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाअंतर्गत शिवामृत दूध संघ अकलूज,विनय वाघदरे यांची केशर आंबा नर्सरी,गांडूळ खत प्रकल्प,मत्स्य प्रकल्पांची पाहणी करून त्यांना अभ्यास करण्याच्यादृष्टीने सदर क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले
होते.विद्यार्थ्यांनी केशर आंबा कलम करण्याची पद्धत,मत्स्यप्रकल्प गांडूळ प्रकल्प यांना भेट देऊन त्याविषयी माहिती समजावून घेतली.शिवामृत दूध संघ अकलूजचे कार्यकारी संचालक रविराज इनामदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना या पदार्थांच्या उत्पादनाची विभागवार माहिती देऊन मार्गदर्शन केले.मानव आणि पर्यावरणातील गुंतागुंतीचे संबंध प्रत्यक्ष अनुभवता आल्याने, विशिष्ट ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक,सामाजिक सांस्कृतिक,ऐतिहासिक,पर्यावरणीय गोष्टींचा सखोल अभ्यास करावयास मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसून येत होते.या प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य अजित पवार, कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विषय शिक्षक प्राध्यापक प्रमोद रेडे,शिक्षक सागर शेटे,विपुल गोसावी, शिक्षिका लक्ष्मी माने,अनिता मोरे,सविता चंदनशिवे, पूनम गायकवाड,राधा शिंदे मदतनीस आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभव मिळावा, भौगोलिक व सामाजिक घटकांचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे,नकाशे,पुस्तके अथवा चित्राऐवजी प्रत्यक्ष ठिकाणास भेट देऊन हवामान,माती,वनस्पती, प्राणी,लोकजीवन यांचा अनुभव मिळावा.मानवीवस्ती,शेती उद्योगासारख्या वर्गात शिकलेल्या भौगोलिक आणि सामाजिक संकल्पना प्रत्यक्ष पाहता याव्यात या उद्देशाने या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य अजित पवार, अमोल माध्य.व उच्च माध्य.विद्यालय करकंब.





















