मुदखेड – राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेड च्या वतीने संत शिरोमणी जगद्गुरु रविदास महाराज यांच्या ६४९ व्या जयंती महोत्सव निमित्त सर्व चर्मकार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहण राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड, मुदखेड तालुकाध्यक्ष सुभाष दुधंबे यांनी केले आहे.
संत शिरोमणी जगद्गुरु रविदास महाराज प्रेमी व चर्मकार समाज बांधव यांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेड च्या वतीने संत शिरोमणी जगद्गुरु रविदास महाराज यांच्या ६४९ व्या जयंती महोत्सवा निमित्त दि. ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही शोभायात्रा महात्मा फुले पुतळा आय. टी. आय. पासून सकाळी ठिक ११ वाजता सुरुवात होणार आहे शक्तीनगर नांदेड येथे आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आपल्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात विसर्जित होणार आहे.
तरी सर्व चर्मकार समाज बांधवांनी आपआपली दुकाने, प्रतिष्ठान बंद ठेऊन व कर्मचारी बांधवांनी एक दिवसाची रजा घेऊन कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने चर्मकार समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड,मुदखेड तालुकाध्यक्ष सुभाष दुधंबे यांनी केले आहे.






















