सोलापूर : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, संरक्षणात आणि संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या संघर्षात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर हुतात्म्यांना ३० जानेवारी हुतात्मा दिनी सोलापूर महापालिकेच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. दोन मिनिटे मौन पाळून आपापल्या कार्यालयात उभे राहून कर्मचाऱ्यांनी आदरांजली वाहिली. त्यांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले.
सर्व हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी पालिकेच्या वतीने इंद्रभूवन आवारात सकाळी 11 वाजता अग्निशामक दलाच्या गाडी मार्फत 2 मिनिटे सायरन वाजविण्यात आला. त्यावेळी पालिकेच्या सर्व विभागातील कार्यालयात सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी आपल्या आपल्या कार्यालयातील जागी उभे राहून आदरांजली वाहिली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे ,अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे , सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगरचना सहसंचालक मनीष भिष्णूरकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
























