सोलापूर – वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने मौलाना आझाद रिक्षा स्टॉपचा १५८ वा नामफलक मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या नामफलकाचे उद्घाटन प्रदेश अध्यक्ष रियाज भाई सय्यद आणि नुरुद्दीन मुल्ला यांच्या शुभहस्ते पार पडले.
या कार्यक्रमास रिक्षा स्टॉप अध्यक्ष सर्फराज पिरजादे तसेच शहर अध्यक्ष इरफान कल्याणी यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली. उद्घाटनप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांच्या हक्कांसाठी संघटना सातत्याने कार्यरत असून संघटनेच्या माध्यमातून चालकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रदेश अध्यक्ष रियाज भाई सय्यद यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वाहतूक संघटना संयुक्त महासंघ ही केवळ संघटना नसून रिक्षाचालकांच्या एकजुटीचे प्रतीक आहे. प्रत्येक रिक्षा स्टॉपवर संघटनेचा नामफलक उभारून चालकांमध्ये संघटितपणाची भावना अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. या उद्घाटनामुळे मौलाना आझाद रिक्षा स्टॉप परिसरात समाधानाचे वातावरण असून रिक्षाचालकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
या वेळी संघटने पदाधिकारी प्रदीप शिंगे, इम्रान शेख, अखिल शेख, शंकर राऊत, अशोक बनसोडे, मजहर शेख, अप्पू सुतार, आणि रिक्षा स्टॉप चे इलियास वालसंगकर रझाक दंडोती एजाज शेख सद्दाम शेख, माजीद पेशमाम या सह शिक्षा स्टॉप चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
























