पंढरपूर – पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून, दक्षिण काशी म्हणून जसे प्रसिद्ध आहे, तसेच या पंढरीला कलेचा वारसा देखील दैदिप्यमान लाभलेला आहे. अनेक शतकांची ही पुण्यभूमी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. तसेच अनेक दिग्गज कलाकार देखील या भूवैकुंठात जन्म घेतलेले आहेत. साहित्य, कला, संगीत व नाट्य या विविध क्षेत्रात अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कलासाधना जोपासली आहे. अशा कलाकारांना गेली १८ वर्ष हा पुरस्कार देण्यात येत असतो. या वर्षीचा पंढरी कलारत्न पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांना माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत, सोलापूरचे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये भरघोस यश प्राप्त करुन सहाय्यक महसूल यापदी निवड झाल्याबद्दल कु. सोनिया शरद कागदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विषयात सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल कु. प्रतीक्षा भारत माळी, दिल्ली कॅपिटल्स संघाच्या टीम डॉक्टर व मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ महिला संभाव्य संघात खेळाडू म्हणून निवड झाल्याबद्दल कु. वेदिका चंद्रकांत मगर, तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षाखालील मुलिंच्या टी२० व वनडे संघात निवड झाल्याबद्दल कु. भक्ती गणेश पवार व राष्ट्रीय पातळीवर स्वच्छ व निरोगी भारत याविषयी माझ्या पाच कल्पना या शोध निबंधास राष्ट्रपती पारितोषिक मिळाल्याबद्दल चि. संस्कार अशोक आवताडे, व घनकचरा व्यवस्थापन या शोध निबंधास राष्ट्रपती पारितोषिक मिळाल्याबद्दल चि. सार्थक सिध्देश्वर लेंगरे यांना विशेष गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम कर्मयोगी सभागृह, पंढरपूर अर्बन बॅंक खवाबाजार शाखा, पंढरपूर येथे रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५-३० वा संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलासाधनाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत प्रभाकर बडवे महाजन यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. विनायक परिचारक, वा. गो
भाळवणकर सर, सचिव ज्ञानेश्वर मोरे, डॉ. कैलाश करांडे सर, अमरसिंह चव्हाण सर, अभियंता राजेंद्र माळी साहेब, रणजीत पवार, अरिहंत कोठाडिया, अक्षय अनिरुद्ध बडवे, डॉ. किरण बहिरवाडे, अभिराज बडवे, प्रा. राजेंद्र मोरे, राजकुमार शहा तरडगावकर, डॉक्टर बसवराज सुतार, डॉक्टर आनंद भिंगे, राजकुमार आटकळे, बसवराज बिराजदार, प्रा. मंदार परिचारक, महेश अंबिके, अमृतभाई शहा, डॉ. किरण बहीरवाडे, अनंता नाईकनवरे,अशोक आवताडे सर, महेश देशपांडे, नारायण बडवे, सौ. मंदाकिनी देशपांडे, डॉ. सौ. मैत्रेयी केसकर, सौ. प्रतिभा यादव, सौ. सारिका कोठाडिया,अनिरुद्ध बडवे पाटील, संतोष कुलकर्णी सर, शिवाजी यादव आदी कलासाधनाचे सदस्य विशेष प्रयत्नशील आहेत.

























