बार्शी – तालुक्यातील उपळे दुमाला येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित वखारिया विद्यालयात ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर, लिपिक दादासाहेब धनके (पाटील) यांचे हस्ते महात्मा गांधी आणि कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त कर्मवीर सप्ताहाचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकाली दुःखद अपघाती निधन झाल्यामुळे कर्मवीर सप्ताह सांस्कृतिक कार्यक्रम वगळून अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. याप्रसंगी अजितदादांना ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने केले होते कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
























