बार्शी – तालुक्यातील युनिक पब्लिक स्कूल उपळाई (ठोंगे) येथे मकर संक्रातनिमित्त महिला हळदी कुंकू कार्यक्रम तसेच महिला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. सालाबादप्रमाणे मकर संक्रातनिमित्त माता पालकांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेच्यावतीने करण्यात आले होते. सुरुवातीला जिजामाता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित महिला वर्गाच्यावतीने करण्यात आले. त्यानंतर माता पालक व शिक्षक सहविचार सभा संपन्न झाली.
हळदी कुंकू कार्यक्रमानंतर महिलासाठी स्पर्धा घेण्यात आल्या. फुगवलेल्या फुग्यावरती स्वतः चे पूर्ण नाव लिहिणे. या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ६० सेकंदात जो सर्वात जास्त नाव लिहिल तो विजेता ठरवला गेला. या स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले. त्यानंतर संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये देखील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले. या सर्व विजेत्यांना प्रशालेतर्फे बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीस वितरण संस्था सचिव अनुराधा माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय ढगे, भाग्यश्री ढगे, जरीता साठे, निलोफर खान, सप्नाली जाधव व विकास कांबळे उपस्थित होते.
























