सांगोला – तालुक्याच्या विकासासाठी माझ्याकडे खूप मोठी दूरदृष्टी असून माझी स्वप्ने वेगळी आहेत. सांगोला तालुक्यातील एकही गाव शेतीच्या व पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही याच्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. १९९५ व २०१९ ला आमदार झाल्यानंतर तालुक्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. त्यामुळे मी जनतेचे उपकार विसरणार नाही. नगरपालिकेत आपली सत्ता आली आहे. जि.प व पं.स येथेही आपणास सत्ता खेचून आणायची आहे असे प्रतिपादन माजी आ. शहाजीबापू पाटील यांनी केले. ते कडलास येथे महायुती उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
कडलास येथील खंडोबा मंदिर, सिद्धनाथ मंदिर व ग्रामदैवतांना नारळ फोडून माजी आ.शहाजीबापू पाटील, महायुतीच्या कडलास जि.प.गटाच्या उमेदवार शोभाताई खटकाळे, गणाच्या उमेदवार राणीताई पाटील व मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपचे शिवाजीराव गायकवाड, डॉ.विजय बाबर, सुनिलनाना पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी माजी जि.प.सदस्य अशोक शिंदे, सागरदादा पाटील, उद्योगपती योगेश खटकाळे, बाळासाहेब आसबे, प्रशांत तेली, माजी सरपंच दिगंबर भजनावळे, चेअरमन अनिल खटकाळे, ग्रा.पं.सदस्य राहुल गायकवाड, विजय ननवरे, मंगलताई लेंडवे, जयश्री पवार, मालन गायकवाड, प्रणाली शिंदे, वनिता केदार, वर्षा पाटील, दत्ता गायकवाड, दिगंबर गायकवाड, तानाजी शिंदे, योगेश गायकवाड, उद्धव गायकवाड, महादेव गायकवाड, शिवाजी ठोकळे, विजय गायकवाड, गणेश लवटे, भाऊसाहेब खटकाळे, पांडुरंग आसबे, प्रभाकर भगरे, योगेश गायकवाड, सुदर्शन लिगाडे, वैभव गायकवाड, राजलक्ष्मी पाटील, अर्चना गायकवाड, अश्विनी गायकवाड उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीत आमच्या कुटुंबाचा नेहमी सहभाग असतो. बापू आमदार नसताना आजही विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. कडलास गावातील मतदारांनी कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता शिवसेनेचे दोन्ही उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत असून त्यांना बहुमताने विजयी करावे.
– योगेश खटकाळे
























