सोलापूर – जिल्हा न्यायालयिन कर्मचारी व अधिकारी यांच्या जिल्हास्तरीय 14 वी डिस्ट्रिक्ट कोर्ट प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा ह्या दिनांक 18, 24 ते 26 जानेवारी या कालावधीत भंडारी मैदान जुळे सोलापूर येथे चुरशीच्या संपन्न झाल्या. पुरुषांच्या 14 व महिलांच्या 4 संघात या स्पर्धा रंगतदार झाल्या. अंतिम सामना हा माळशिरस मिराकल्स व CJM चॅलेंजर्स सोलापूर यांच्यात झाला. त्यामध्ये माळशिरस मिराकल्स संघाने विजेतेपद संपादन केले तर उपविजेते पद CJM चॅलेंजर्स यांनी पटकावले.
विजेत्या संघास ट्रॉफी व ॲड. रियाज शेख यांच्यातर्फे रोख 11000 रुपये बक्षीस,तर उपविजेते संघास ट्रॉफी व 8000 रुपये रोख ॲड. मनोज पामूल यांच्यातर्फे देण्यात आले. बक्षीस समारंभ जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मनोज जी शर्मासाहेब, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. मिलिंदजी थोबडे साहेब, ॲड. रियाज शेख, ॲड.मनोज पामुल , ॲड. राजेंद्र फताटे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्य न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण महासंघाचे अध्यक्ष Dnyaneshwar लिंबोळे, नबी शेख,बालाजी पिसे, पवन गायकवाड, इरेश बिराजदार, कनकी बंधू, रफीक पठाण, शाम राजेपांढरे, व अनेक कर्मचारी, वकील यांनी परिश्रम घेतले.
























