सोलापूर – महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक अर्जुन व्हटकर यांना येळ्ळूर ग्रामीण साहित्य संघ येळ्ळूर ता.बेळगाव यांच्यावतीने दिला जाणारा दिवंगत गंगुबाई गुरव साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
नुकतेच ग्रंथाली प्रकाशन मुंबईने प्रकाशित केलेल्या “चलबट”या त्यांच्या आत्मचरित्रास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे त्याचे वितरण दिनांक एक फेब्रुवारी 2026 रोजी येळ्ळूर ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष दोऊळ सिनेमाचे निर्माते माननीय श्री गिरीश कुलकर्णी (सेने अभिनेते,पुणे) यांच्या हस्ते प्रधान करण्यात येणार आहे. त्यांच्याबरोबर प्रा.राजेंद्र कुंभार (जयसिंगपूर) डॉ अभिजीत गोगटे (बेळगाव) मनीषा तोपले (बीड) राजेंद्र चलवादी (येळूर )मनीषा सुभेदार –प्रदीप देसाई (बेळगाव) चिन्मय पाटील–श्रीधर कांत कानशिडे (येळूर) इत्यादी सन्माननीय व्यक्तींना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गेली 25 वर्ष हे संमेलन आणि पुरस्कार अव्याहतपणे चालू आहेत.
अर्जुन व्हटकर यांच्या “तुंबण”या कथासंग्रहाला यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा कै. ग ल ठोकळ पुरस्कार, “मुक्या जंगलाची गर्जना” या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा कै. पंजाबराव देशमुख पर्यावरण पुरस्कार तसेच मध्यप्रदेश शासनाचा भोपाळ साहित्य अकादमीचा कै. भा. रा. तांबे पुरस्कार प्राप्त झालेला आहे.तसेच मनोरमा परिवार सोलापूर, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर, भि ग रोहमारे पुरस्कार कोपरगाव, माहेश्वरी अर्बन बँक पुरस्कार,कै देशभक्त मळवंत नगर पुरस्कार, कै. गोविंदराव अदिक पुरस्कार कै. शंकराव पाटील पुरस्कार. कै. शांता शेळके पुरस्कार, सेतुबंध पुरस्कार, डिसले पुरस्कार, वरणगावकर पुरस्कार जळगाव, अशा महाराष्ट्रातील अनेक नामांकित संस्थेचे पुरस्कार अर्जुन व्हटकर यांच्या साहित्यकृतीला मिळालेले आहेत.
























