अजित पवारांच्या सरकारमधील एन्ट्रीवरून राज ठाकरेंनी परखड टीका केली आहे राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत गेली आहे, दुसरीही लवकरच जाईल, असं राज ठाकरे म्हणाले. अजित पवारांना जेलमधून टाकू असं म्हणणाऱ्यांनीच त्यांच्यासोबत युती केली अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
टोलच्या मुद्द्यावर राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आहे. अमित सध्या महाराष्ट्रभर दौरे करत आहे. तो टोल फोडत चालला असे काही नाही. फास्ट टॅग असून देखील अडवले. अमित ठाकरेंसोबत अरेरावीची भाषा वापरण्यात आली. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले. रस्त्याची अवस्था अतिशय बिकट असताना देखील टोल वसुली कशासाठी असा सवाल राज ठाकरे यांनी या वेळी उपस्थित केला आहे. भाजपाने निवडणुकीत टोल मुक्त महाराष्ट्र करु असं सांगितल होत त्याचं काय झालं हे देखील भाजपने सांगावे, असे देखील राज ठाकरे म्हणाले.
समृद्धी महामार्गावरून सरकारवर निशाणा
समृद्धी महामार्गावर वारंवार अपघात होतात. समृद्धी महामार्गावर झालेल्य अपघातात जवळपास 400 जणांचा मृत्यू झाला आहे. तरी देखील समृद्धी महामार्गावर अजूनही फेन्सिंग नाही त्यामुळे जनवार हायवेवर येत आहेत. अपघातात लोकांचा जीव जातो ही सरकारची जबाबदारी नाही का? असा प्रश्न उपस्थित करत समृद्धी महामार्गावरून सरकारवर निशाणा साधला आहे.
केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचा आहे तरीही राज्याच्या रस्त्यांची दूरवस्था
17 वर्ष झालं मुंबई-गोवा हायवेचे काम अजूनही सुरू आहे. केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचा आहे तरीही राज्याच्या रस्त्यांची दूरवस्था आहे. केंद्रत महाराष्ट्राचा मंत्री असून महाराष्ट्राचे रस्ते खराब आहे यासारखे दुर्दैव नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी नितीन गडकरींना टोला लगावला आहे.राज ठाकरे म्हणाले, रामायणातील सेतू 12 वर्षांत बांधून झाला. मुंबई बांद्रा सी लिंकला 10 वर्षे लागली, हे पाहता बहुधा तेच पुढारलेले होते, असे वाटते.
इर्शाळवाडी दुर्घटनेचा देखील राज ठाकरे यांनी खरपूस समाचार केला आहे. इर्शाळवाडीला अलर्ट असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केले.आपल्याकडे राज्यात मुलांनी अलर्ट देणारे काही मॉड्युलर तयार केले आहे. ते आपत्ती येण्यापूर्वी इशारा देतात परंतु मुलांचे हे काम पाहण्यासाठी सरकारकडे लक्ष वेळच नाहीत, असे देखील राज ठाकरे म्हणाले.