नाशिक महानगरपालिका, आर. डी. ग्रुप, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोजक तत्वावर विकसित केलेल्या वाहतूक बेट आणि जॉगिंग ट्रॅकचे आज नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते आणि आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. नवीन नाशिक मधील कर्मयोगीनगर येथील चौफुलीचे सुशोभीकरण करण्याची संकल्पना प्रभाग क्र. २४ चे माजी नगरसेवक तथा शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी मांडली. त्यासाठी, उद्योजक आणि आर. डी. ग्रुपचे संचालक राहुल देशमुख यांनी सकारात्मक पुढाकार घेतला. त्यातूनच कर्मयोगीनगर मध्ये सुंदर जॉगिंग ट्रॅक आणि आकर्षक वाहतूक बेट उभारण्यात आले.
नागरिकांना बसण्यासाठी आकर्षक व्यवस्था सर्कलच्या बाजूला करण्यात आली आहे. शहर सौंदर्यीकरणासाठी प्रविण (बंटी) तिदमे आणि राहुल देशमुख यांनी घेतलेल्या सदस्य पुढाकाराचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी कौतुक केले.