श्रीपूर – ता . माळशिरस येथिल प्रवर्तन फाऊंडेशनच्या माध्यमातून येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत कश्मिर मधील पुंछ भागाच्या सिमावर्ती भागात म्हणजेच भारत – पाकिस्तान सिमेलगत भव्य १०५ फूट उंचीचा भारताचा तिरंगा ध्वज लहणार असल्याची माहिती प्रवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष निनाद पटवर्धन यांनी दिली .
या प्रसंगी फाऊंडेशनचे क्रियशिल सदस्य बांधकाम व्यावसायिक चंद्रशेखर मोकाशी , शाम मांगले , श्रीपाद कुलकर्णी , मोहन कवडे ,अकलुज येथिल सचिन शिन्द उपस्थित होते .
अधिक माहिती देताना पटवर्धन म्हणाले की , गेल्या अनेक वर्षा पासून आम्ही प्रवर्तन फाऊंडेशनच्या माध्यमातून कश्मिर मध्ये सामाजिक उपक्रम राबवत असून आज पर्यंत कश्मिर मधील दुर्गम भागातील महिलांना गृह उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती उपलब्ध करून दिली आहे . तर विद्यार्थ्यांसाठी क्रिडा स्पर्धा , स्वयंरोजगार निर्मितीचे प्रशिक्षण असे उपक्रम राबविले आहेत . या बरोबरच पुण्याच्या भाजपाच्या विद्यमान खा . माधुरीताई कुलकर्णी यांनीही आम्ही दुर्गम भागात रुग्णांना दवाखण्यात जाण्यासाठी यातना होतात ही बाब सांगताच त्यांनी सुसज्ज असणारी रुग्णवाहीका उपलब्ध करून दिली आहे .
कश्मिर मध्ये काम करत असताना अनेक दिवसां पासूनची आमची ईच्छा होती भारत – पाक सिमेलगत आपल्या भारताला ध्वज उभारावा आम्ही ही कल्पना लष्करी अधिकाऱ्यांच्या कानावर घातल्यावर त्यांनी तातडीने होकार दर्शवला परंतू १०५ फूट उंचाचा ध्वज उभारणे म्हणजे अर्थकारणही महत्वाचे होते .
परंतू करमाळा तालुक्याच्या माजी आ. रश्मीताई बागल यांच्या भेटी दरम्यान हा विषय निघाला असत रश्मीताईंनी क्षणाचाही विलंब न लागता ध्वज उभारणीसाठी येणारा सर्व खर्च देण्याचे जाहीर करून निधीही उपलब्ध करून दिला .
येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत लष्कराचे जनरल ऑफ कमांडर त्रिपाठी यांचे हस्ते ध्वजारोहण होणार असून या प्रसंगी कर्नल जेकब , लेक्टनंट अंकीत व प्रवर्तन फाऊंडेशनचे पदधिकारी उपस्थित राहणार आहेत . प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आम्ही फाऊंडेशच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून ‘मेरा देश मेरा वतन ‘ या विषयावर वकृत्व स्पर्धा व बक्षिस वितरण समारंभ , तसेच जनावरांसाठी सिरसा कंपनीच्या सहकार्याने तपासणी व औषधोपचार शिबीराचे आयोजन केले असल्याचे सांगीतले .
सर्वात महत्त्वाचे म्हणजे नुकतेच भारत सरकारने सिंदूर ऑपरेशन यशस्वी केले त्याच भागात २६ जानेवारी पासून भारताला तिरंगा डौलाने फडकणार असल्याने सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे .

























