बनशंकरी नगर शेळगी इथ राहणाऱ्या एका २६ वर्षीय विवाहित महिलेने अज्ञात कारणावरून सिद्धेश्वर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. इरम्मा लिंगराज मेळी असे त्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घटना उघडकीस आली. महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. मंदिराच्या सुरक्षा रक्षकांच्या मदतीने फौजदार चावडी पोलिसांनी तो बाहेर काढला. सिव्हिलमध्ये दीर जयराज मेळी यांनी दाखल केले. डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृत महिलेच्या मागे पती, दोन मुली, दीर- जाऊ, सासू सासरे असा परिवार आहे. नाईक पाटील तपास करीत आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...