लोहा येथील पायोनियर इंग्रजी शाळेच्या बोगस चालकाने पालकाची केली दिशाभुल
:मान्यता वेगळ्या शाळेला भिंतीवर बोर्ड दुसरा नावाचा
लोहा.
पायोनियर इंग्रजी शाळेच्या बोगस चालकाने पालकांची दिशाभूल करुन शहरात टॉपरचे विद्यार्थी घडवतो म्हणुन दिशाभूल करण्याचा गोरख धंदा सुरु केला होता.या धंद्याला आळा घाला म्हणुन सुज्ञ पालकानी जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार केली.
पायोनियर बोगस चालकाचा वेगळाच फंडा व मनमानी कारभार चालू. माझ्याकडे वर्ग शिकवणीसाठी ठेवायचे आसेल तर माझ्या मनाप्रमाणे रक्कम द्यावी लागेल शाळा फिस परवडत नसेल तर माझ्या शाळा शिकवणी वर्गात प्रवेश घेऊ नका आशी बतावणी करुन श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता.
शाळेच्या बोर्डावर नाव आसलेल्या शाळेला चौथी पर्यंत मान्यता आसताना सिबीएससीचा अभ्यासक्रम पुर्ण करतो अशी भुलथाप मारुन सातवी पर्यंतचे विद्यार्थी एकञ केले जात होते. सिबीएससीच्या अभ्यासक्रमाचा फलक लावून पालकाची फसवून करुन दिशाभूल केली जात होती.
या शाळेतील विद्यार्थ्यांना- -टीसी जिल्हा परिषद व अन्य शाळेची देण्याचा गोरख धंदा चालू केला होता.
शाळेच्या भिंतीवर वेगळ्या शाळेच्या नावाचा बोर्ड लावून पालकाला आकर्षक केले जात होते .शाळेच्या बोर्डावर सुसज्ज ईमारतीचा फोटो लावून भरमसाठ फिस घेऊन शाळा भरवली जाते होती.तेही पडक्या गोदामात शाळा भरवली जात होती.या प्रकारामुळे सुज्ञ तरुणांनी जिल्हाधिकारी ,शिक्षण विभाग, पोलिस स्टेशन येथे निवेदन तक्रारी केली या तक्रारीची दखल घेऊन शिक्षण विभागाने तपासणी करण्यासाठी पथक नेमले त्या पथकाने ५ जुलै रोजी शाळेची तपासणी केली .
सीबीएससी पॅटर्न असलेला बोर्डाची तपासणी केली.पायोनियर पब्लिक स्कुल असा बोर्ड असलेल्या या शाळेची तपासणी केली पण या ठिकाणी किंग्ज विजडम पब्लिक स्कुल नावाच्या शाळेला कायम विनाअनुदानित अशी मान्यता आहे . तपासणीत केलेल्या चौकशीत आढळून आले या युनिटला चौथी वर्गा पर्यंत मान्यता आहे पण सातवी पर्यंत वर्ग भरविले जाते हि बाब नमुद केली
पण शाळेच्या भिंतीवर पायोनियर बोर्ड आसल्याने या नावाची चौकशी केली इंग्रजी माध्यम शाळा शासनाच्या यु-डायस साईट वर पयोनिअर इंग्लिश स्कुल हे नावच नाही हा बोर्ड का लावला आशा मुद्दा विचारुन तपासणी अहवालात नोंद केला.चालकाने किंग्ज विसडम पब्लीक स्कुल ही शाळा करोना काळा नंतर कोणाची तरी चालवायला घेतली आहे.या शाळेला कायम विनाअनुदानित चौथी पर्यंत शासन मान्यता आहे पण या पुढे नैसर्गिक वाढीची मान्यता घेतली नाही चालकाने या शाळेचे नाव बदलून पायोनियर शाळेच रुपांतर करुन वर्ग सुरू केले
पायोनियर “या नावाने जाहिरात सुरु केली या नावाने शाळेत वर्ग सुरु केले.पण या शाळेची मान्यता किडस किंगडम पब्लिक स्कुल अशी आहे गटशिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार ५ जुलै रोजी ब्रँच कन्या संकुलाचे केंद्र प्रमुख भगवान कदम व केंद्र प्रमुख ए .वाय कावलगावकर यांनी तपासणी केली तपासणीत अनेक तुर्टी व गंभिर बाबी आढळुन आल्याचे नमुद केले. या शाळेतील पायोनियर शाळेच्या नावाने प्रवेश निर्गम,हाजरी पटावर विद्यार्थीची नोंद नाही तपासणीत अहवाल नमुद केले या प्रकाराची चौकशी करावी म्हणुन
भाजपा युवा मोर्चाचे बंडू वडजे यांनी जिल्हाधिकारी, शिक्षण विभाग नांदेड याना लेखी निवेदन देऊन चौकशीची मागणी केली.
लोहा तहसीलदार व पोलिस स्टेशन ला निवेदन दिले.
————-
भरमसाठ फिस घेणाऱ्या बोगस शाळेची चौकशी करावी असे युवा नेते गजानन पाटील कऱ्हाळे सुजित चव्हाण, सुनिल पवार,स्वप्निल पांचाळ,माधव पाटील जामगे,विशाल कोरडे, किरण राठोड, बालाजी मोरे, संतोष पवार, दिपक उंडाडे, प्रदीप पा वडजे, आनंदा कऱ्हाळे , अंगद जाधव यांनी तहसीलदार विठ्ठल परळीकर यांना निवेदन दिले व पोलिस निरीक्षक ओंमाकांत चिंचोळकर यांना अंबादास पवार ,बाळु पवार,यांनी तक्रार निवेदन दिले.