सोलापूर : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सहस्त्रार्जुन संकुलाच्या प्रांगणात प्राथमिक विभागातर्फे बालजत्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील पालकांकडून खाद्यपदार्थांचे स्टॉल ठेवले जातात .यावर्षी 70 ते 75 खाद्यपदार्थांचे स्टॉल होते.
बाल जत्रेचे उद्घाटन केशर ताई भूमकर ,सारिका बिद्री तसेच समाजातील प्रतिष्ठित महिला मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कुमारी अंजली अलुरे हिने सावित्रीबाईंवर सुंदर गीत सादर केले. सर्व संकुलातील पालक, परिसरातील जवळजवळ दीड ते दोन हजार नागरिकांनी या पदार्थांचा आस्वाद घेतला. मुख्याध्यापिका मंजुषा माने यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. या कार्यक्रमाप्रसंगी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजू भूमकर, विठ्ठल मंदिरट्रस्टचे अध्यक्ष श्री संजीव बिद्री , सचिव जयकुमार कोल्हापुरे, संस्थेचे सचिव गजानन गोयल, सदस्य संजीव रंगरेज, गणेश दामजी, शिरीष कोल्हापुरे , तुकाराम पवार , भरतकुमार शालगर ,श्रीराम पवार, सुरेश बिद्री,अनिल रंगरेज प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर, इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका सविता हातवळणे
त्याचबरोबर महिला मंडळाच्या अध्यक्ष वर्षा मगजी युवती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष गीता हबीब, रंजीता रंगरेज, मोनाली रंगरेज ,विद्या गोयल, रूपाली दामजी ,विद्या पवार सुरेखा पवार , सरस्वती रंगरेज, पार्वती भुमकर आदी उपस्थित होते. परीक्षण करण्यासाठी हॉटेल व्यवसायिक निखिल लोमटे हे लाभले होते.
कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ वंदना आळंगे, सुवर्णा केत तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी,सेविका यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भारती बुरगुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मी बिच्चल यांनी केले.
—
























